शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकाधारकांची दिवाळी ‘गोड’

By admin | Updated: October 21, 2014 22:45 IST

दिवाळीचा आनंदोत्सव सर्वत्र मोठ्या धुमधळाक्यात साजरा करण्यात येतो. सर्वसामान्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी प्रशासनाने बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी साखर उपलब्ध केली आहे.

भंडारा : दिवाळीचा आनंदोत्सव सर्वत्र मोठ्या धुमधळाक्यात साजरा करण्यात येतो. सर्वसामान्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी प्रशासनाने बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिका धारकांसाठी साखर उपलब्ध केली आहे. दिवाळी असल्याने प्रती व्यक्ती ६६० ग्रॅम साखरचे वाटप करण्यात येणार असून १६० ग्रॅम साखर अतिरिक्त वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी ४ हजार ८२० क्विंटल साखर प्राप्त होणार आहे. याचा लाभ जिल्ह्यातील ७ लाख २८ हजार ७१७ लाभार्थ्यांना मिळणार आहे.अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना राशनचे वाटप राशन दुकानाच्या माध्यमातून करण्यात येते. जिल्ह्यात बीपीएल व अंतोदय शिधापत्रिकाधारकांना तांदुळ व गहुचे नियमित वाटप करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून साखरेचे वाटप बंद करण्यात आले होते. मात्र ते पुर्ववत सुरू करण्यात येत आहे. शिधापत्रिकाधारकांना नियमित ५०० ग्रॅम साखर वाटप करण्यात येते. मात्र दिवाळी असल्याने प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांना १६० ग्रॅम जादा साखर वाटप करण्याचे आदेश पुरवठा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राशन दुकानदारांना दिले आहे.जिल्ह्यातील अनेकांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभ मिळावा, यासाठी राशनकार्डची जोडणी केली होती. मात्र त्यातील १० हजार ४४८ राशनकार्ड धारकांचे उत्पन्न जास्त असल्याने त्यांना या योजनेचा लाभधारकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. जिल्ह्यात ७ लाख २८,७१७ बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. यात बीपीएल ४ लाख ३८,६९० तर अंतोदयचे ३ लाख ४९५ लाभार्थी आहेत. या सर्वांना तांदुळ, गहू व साखरेचे वाटप करण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)