शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

युनिव्हर्सल कारखाना खरेदीचे रामदेवबाबांचे संकेत

By admin | Updated: June 1, 2016 01:43 IST

युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु व्हावा याकरिता राजकीय पक्षात चढाओढ सुरु आहे. परंतु राजकारणाशी काही संबंध नसताना

आचार्य बालकृष्ण यांची माहिती : भारत स्वाभिमानचे राणा यांनी घेतली भेटतुमसर : युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु व्हावा याकरिता राजकीय पक्षात चढाओढ सुरु आहे. परंतु राजकारणाशी काही संबंध नसताना भारत स्वाभिमान संघटनेने हरिद्वार येथे रामदेवबाबा व आचार्य बाळकृष्ण यांची भेट घेऊन युनिव्हर्सल फेरो कारखाना खरेदी करण्यासाठी निवेदन दिले. संबंधितांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत रामदेवबाबांनी दिले.तुमसरजवळ मॅग्नीज शुद्ध करणारा युनिव्हर्सल फेरो कारखाना १० वर्षापासून बंद आहे. ३०४ एकर जागेतील हा कारखाना वैनगंगा नदीकाठावर आहे. भंडारा जिल्ह्यातील पहिला उद्योगाला अवकळा आली होती. वीज बिलापोटी कारखान्यावर २५० कोटी रूपये थकीत होते. अवसायानात गेलेल्या उद्योगातून बाहेर पडला नाही. दरम्यान येथील कामगार व संघटनांनी आंदोलने केली. दरम्यान कंपनी मालक व कामगारांनी नियमानुसार विविध आयुधांचा वापर केला. आजारी उद्योगधंद्यासाठी केंद्र शासनाने योजना राबविली. त्याचा लाभ या कारखान्यालाही झाला. परंतु कारखाना मात्र सुरु झाला नाही.केंद्रात व राज्यात सत्ताबदल झाला. बेरोजगारांना रोजगार प्राप्त व्हावा, आर्थिक संपन्नता परिसरात यावी तथा स्थानिकांचा दबाव वाढून पुन्हा हा कारखाना चर्चेत आला. खासदार नाना पटोले यांनी हा कारखाना पतंजली उद्योगसमूह खरेदी करण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली होती. त्यानंतर ‘युनिव्हर्सल फेरो कारखाना पतंजली घेणार’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. त्यानंतर भारत स्वाभिमान संघटनेचे तुमसर तालुकाध्यक्ष रामदास राणा यांनी हरिद्वार येथे रामदेवबाबा व आचार्य बाळकृष्ण यांची भेट घेऊन युनिव्हर्सल फेरो खरेदीसंदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. निवेदनासोबत लोकमतचे कात्रण दिले. युनिव्हर्सलसंबंधी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत रामदेवबाबांनी दिले. कारखाना खरेदीसंदर्भात कच्चा माल, वातावरण, रस्त्यांचे जाळे आदी तपासण्यात येणार असल्याचे रामदास राणा यांनी सांगितले. स्वदेशी, आॅरगॅनिक शेती याकडे रामदेवबाबांनी लक्ष देण्याचे आवाहन केल्याचे राणा यांनी सांगितले. कारखाना सुरू करण्यासंदर्भात आ.चरण वाघमारे यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी यापूर्वी तिनदा चर्चा केली. कारखाना खरेदीसंदर्भात चर्चा सुरू आहे. १ जून रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात मोर्चाचे काढण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे येथे माडगी ते तुमसर लाँग मार्च काढणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)गडकरी यांची भूमिका महत्त्वाचीदेश व राज्यातील दिग्गज भाजपनेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे लक्ष घातले तर या कारखान्याचा निकाल तातडीने लागू शकतो. येथे ना.गडकरी यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.खरेदी-विक्री उद्योगपतीच करणारशासन व प्रशासनावर दबाव आणला तरी शेवटी हा कारखाना उद्योगपतींनाच करावा लागणार आहे. कोट्यवधींचा हा कारखाना तांत्रिक अडचणीत आहे. शासन व प्रशासन येथे मध्यस्थीची भूमिका बजावू शकते. येथे दोन उद्योगपतींमध्ये करार होणे गरजेचे आहे.