शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदीसाठी चळवळ उभारा

By admin | Updated: September 30, 2015 00:50 IST

लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीमुळे अवघ्या सहा महिन्यात गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने खाली आला.

सालेभाटा येथे मेळावा : पारोमिता गोस्वामी यांचे आवाहनभंडारा : लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीमुळे अवघ्या सहा महिन्यात गुन्हेगारीचा आलेख झपाट्याने खाली आला. अनेकांचे राहणीमान उंचावले. अनेकांच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आले. त्यामुळे दारुचे दुष्परिणाम सांगण्यासाठी दारुबंदीसाठी चळवळ उभारा, असे आवाहन श्रमिक एल्गार संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड.पारोमिता गोस्वामी यांनी आयोजित पत्रपरिषदेत केले.सालेभाटा येथे दारुबंदी मेळाव्यासाठी आले असता त्या बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, चंद्रपूर जिल्ह्यात झालेली दारुबंदी ही वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असली तरी तिथे दारु पिण्यासाठी अनेकांकडे परवाने आहेत. त्यामुळे दारु समूळ नष्ट करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात अशा प्रकारचे परवाने दिले गेले नाही. २००१ पासून चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीसाठी प्रयत्न केले. परंतु त्यात यश आले नव्हते. २०१० मध्ये चिमूर ते नागपूर अशी महिलांची पदयात्रा काढून शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर सरकार जागे झाले नाही. त्यामुळे २०१३ मध्ये महिलांनी मुंडण आंदोलन केले. याची राज्य शासनाने दखल घेऊन देवतळे समिती गठित केली. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता आली तर दारुबंदी करण्याचे अभिवचन सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. सत्ता आल्यानंतर त्यांनी शब्द पाळला आणि दारुबंदीच्या प्रयत्नाला यश आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी संत गाडगेबाबा दारुमुक्ती आंदोलन समितीची घोषणा केली. या समितीत नरेश बोपचे, राजेंद्र फुलबांधे, अनिल मेंढे, माधुरी नखाते, हरीष तलमले, सभापती शुभांगी रहांगडाले, माजी सभापती वीणा झंझाड, माजी जि.प. अध्यक्ष अ‍ॅड. वसंत एंचिलवार, रवींद्र खोब्रागडे, अजय तुमसरे यांच्यासह महिलांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)