पावसाची दडी, पऱ्हे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:00:03+5:30

पवनी तालुक्यातील चौरास भाग हा धानपिकासाठी प्रसिद्ध आहे. ८० टक्के धानाची रोवणी केली जाते. यावर्षीही शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पडलेल्या पावसावर धानाची नर्सरी टाकली. मध्यंतरी चांगला पाऊस झाला. परंतु गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली तर दुसरीकडे प्रचंड उन्ह तापत आहे. त्यामुळे नर्सरीतील पऱ्हे वाळण्याच्या मार्गावर आहेत. ओलीताची सोय असलेले शेतकरी सिंचन करीत आहेत.

Rains hide, plants of paddy in danger | पावसाची दडी, पऱ्हे धोक्यात

पावसाची दडी, पऱ्हे धोक्यात

ठळक मुद्देजमिनीला पडल्या भेगा : पाऊस आला नाही तर दुबार पेरणीचे संकट

खेमराज डोये।
लोकमत न्यूज नेटवर्क
आसगाव : गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीला भेगा पडून धानाचे पऱ्हे सुकू लागली आहेत. येत्या दोन-चार दिवसात पाऊस झाला नाही तर धानाची नर्सरी व रोवणी झालेला धान धोक्यात येण्याची चिन्हे पवनी तालुक्याच्या चौरास भागात दिसत आहे. दुबार पेरणीच्या शक्यतेने शेतकरी हादरला आहे.
पवनी तालुक्यातील चौरास भाग हा धानपिकासाठी प्रसिद्ध आहे. ८० टक्के धानाची रोवणी केली जाते. यावर्षीही शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पडलेल्या पावसावर धानाची नर्सरी टाकली. मध्यंतरी चांगला पाऊस झाला. परंतु गत आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली तर दुसरीकडे प्रचंड उन्ह तापत आहे. त्यामुळे नर्सरीतील पऱ्हे वाळण्याच्या मार्गावर आहेत. ओलीताची सोय असलेले शेतकरी सिंचन करीत आहेत. मात्र त्यांनाही भारनियमनाचा फटका बसत आहे. तर काहींनी रोवणी केली, परंतु पावसाअभावी रोवणीही उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. येत्या दोन-चार दिवसात पाऊस झाला नाही तर चौरास भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत.

धरण उशाला कोरड घशाला
अथांग पाणी असलेले गोसे धरण डोळ्याने दिसते. मात्र सिंचनासाठी पाणी मिळत नाही. सिंचनासाठी विहिरीचाच आधार घ्यावा लागतो. परंतु उन्हाळ्यात विहिरींनी तळ गाठला. अशा स्थितीत सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था पवनी आणि लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे.

Web Title: Rains hide, plants of paddy in danger