शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘जय’च्या शोध मोहिमेत पावसाचा व्यत्यय

By admin | Updated: September 27, 2016 00:33 IST

‘जय’ या वाघाच्या शोधात राज्यातील वनधिकारी जंगल पालथे घालण्याकरिता सोमवार सकाळी निघाले.

वनविभाग व्यस्त : दहाही वनपरिक्षेत्रात शोधमोहीमतुमसर : ‘जय’ या वाघाच्या शोधात राज्यातील वनधिकारी जंगल पालथे घालण्याकरिता सोमवार सकाळी निघाले. बुधवारपर्यंत तीन दिवस जंगल पिंजून काढणार आहे. सोमवारी पावसामुळे शोध मोहिमेला काही काळ ब्रेक लावला. पाऊस सुरू असतानाही जयची शोध मोहिम सुरूच होती.आशियातील मोठा वाघ म्हणून जयची नोंद आहे. जयचा शोधाकरिता राज्य व केंद्र शासनाने निर्देश दिले. केंद्र शासनाने एका वाघाकरिता अशी मोहिम राज्यातच नाही तर देशात प्रथमच राबविली आहे. वनपरिक्षेत्राधिकारी, एसीएफ, तथा वनमजूरही या मोहिमेत सहभागी आहे. सोमवारी तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगातील नाकाडोंगरी, लेंडेझरी वनपरिक्षेत्रात जयची शोध मोहिमेला सुरुवात झाली. नाकाडोंगरी परिसरात एसीएफ कोडापे, वनपरिक्षेत्राधिकारी एम. एन. माकडे, अड्याळ क्षेत्रात वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद महेशपाठक यांच्यासह मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी जंगल पिंजून काढला. वादळी पावसाला सुरुवात झाली तरी जंगल पिंजून काढण्यात आले. पावसामुळे वन्यप्राणी फिरत नाही. मंगळवार व बुधवारी पुन्हा सकाळपासून जयची शोध मोहिमेला सुरुवात होणार आहे. नाकाडोंगरी परिसरातील गोबरवाही रेल्वे स्थानकाजवळ दोन दिवसापूर्वी वाघ दिसला होता. झंझेरिया, पांगळी, कारली येथे वाघांचे वास्तव आहे. त्यामुळे या जंगलात शोध मोहिमेतून काय साध्य होते ते कळणार आहे. उमरेड - कऱ्हांडला जंगलातील जय हा शेवटच्या टोकावरील जंगलात येण्याची शक्यता कमी आहे. पंरतु वनखाते मात्र जयचा शोधात आहे हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)