लाखांदुरात गारपिटीसह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 05:00 IST2020-03-09T05:00:00+5:302020-03-09T05:00:31+5:30

होळी उत्सवाची जय्यत तयारी सुरु असतानाच तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसला. सध्या घडीला रबी पिकांची कापणी झाली असली तरी अद्यापही त्यांची मळणी झालेली नाही. कापणी झालेले रब्बी पिक शेतात जमा केलेले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी गोळा केलेल्या शेतपिकावर कुठलेही आच्छादन केले नव्हते. अवकाळी बरसलेल्या पावसाने गोळा केलेले पीक ओले झाले असुन त्यांना अंकुर फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Rain with hail in millions | लाखांदुरात गारपिटीसह पाऊस

लाखांदुरात गारपिटीसह पाऊस

ठळक मुद्देरबी पीक पुन्हा संकटात : कापलेल्या पिकाला अंकुर फुटण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदुर : तालुक्यात होळीच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी दरम्यान गारपिटांसह अवकाळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यात रबी पिकांचे नुकसान होण्याची प्राथमिक माहिती आहे.
होळी उत्सवाची जय्यत तयारी सुरु असतानाच तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसला. सध्या घडीला रबी पिकांची कापणी झाली असली तरी अद्यापही त्यांची मळणी झालेली नाही. कापणी झालेले रब्बी पिक शेतात जमा केलेले आहेत.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी गोळा केलेल्या शेतपिकावर कुठलेही आच्छादन केले नव्हते. अवकाळी बरसलेल्या पावसाने गोळा केलेले पीक ओले झाले असुन त्यांना अंकुर फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर्षी वरुण राजा शेतकºयांवर कोपला की काय...? असा चिंताग्रस्त सवाल तालुक्यातील जनतेत केला जात आहे. खरीप हंगामादरम्यान अतिवृष्टी झाली अन् शेतातील धानपिक वाहुन गेल्याचे देखील अनेकांनी बघितले.
काही नागरिक तर अतिवृष्टीने बेघर झाले होते. त्यातही सावरुन काही अंशी धानपिक झाले. मात्र शासकिय आधारभुत धान खरेदी केंद्रावर धानपिक असताना पुन्हा अवकाळीने झोडपून काढले. अवकृपेने त्यावेळी देखील धानपिक ऊगवल्याचे वास्तव अनेकांनी बघितल्याचे सांगितले. रबी पिकांचे नुकसान झाल्याचे वास्तव असून मोका पंचनामा करून मदत देण्याची मागणी होत आहे.
 

Web Title: Rain with hail in millions