शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने रबी उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसाने रबी हंगामातील अनेक पीकांना मोठा फटका बसला आहे. ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मदतीची मागणी : वर्षअखेरीसही कर्जाचा विळखा कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसाने रबी हंगामातील अनेक पीकांना मोठा फटका बसला आहे. रबी हंगामातील गहू, हरभरा, लाखोरी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
तालुक्यातील खमारी, आंबाडी, भिलेवाडा, पिंडकेपार, सालेबर्डी, गुंथारा, धारगाव, करचखेडा, सिंगोरी, पलाडी, आमगाव, उसरागोंदी, टेकेपार डोडमाझरी, दिघोरी आदी परिसरातील पिकांचे उत्पादन घटल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
खरीप हंगामातील परतीच्या पावसाचा देखील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे यावर्षी सातत्याने संकटात सापडलेला बळीराजा अद्यापही बाहेर निघू शकला नाही. अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाख्याने जिल्ह्यातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रबी हंगामातील पीकांची काढणीची लगबग सुरु असतानाच अवकाळीच्या तडाख्याने पीके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे रबी पिकांच्या उत्पादनात सुमारे ७० टक्के घट झाली असल्याची माहिती आहे.
शासनाने शेतकºयांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे. यावर्षी सातत्याने कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. गत आठवड्याभरापासून अनेकवेळा अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने यात आणखीच भर पडली आहे.

सततच्या पावसाने शेतकरी त्रस्त
लाखांदूर तालुक्यातील मासळ परिसरात अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांसह गहू, हरभरा पीके संकटात सापडली आहे. अनेक ठिकाणी गहे काळवंडला असून कापणी केलेल्या रबी पिकांचा कडपा भिजल्याने शेतकरी धास्तावले आहे. एकाच आठवड्यात दोनदा अवकाळीसह गारपीटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कायम राहणार आहे.

टॅग्स :agricultureशेती