शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अजगराने केली शेळी गिळंकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 00:16 IST

इंदिरानगर-राजेदहेगाव सीमेलगत असलेल्या नाल्याजवळ चरत असलेली १० किलोची शेळी अजगराने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला.

इंदिरानगर-राजेदहेगाव सीमेवरील घटना : दोन दिवसानंतर सोडले जंगलातप्रल्हाद हुमणे जवाहरनगरइंदिरानगर-राजेदहेगाव सीमेलगत असलेल्या नाल्याजवळ चरत असलेली १० किलोची शेळी अजगराने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान सर्पमित्राला पाचारण करण्यात आले असता, अर्धी शेळी अजगराने गिळली होती. अजगराला पकडून त्याला कोका जंगलात सोडण्यात आले.इंदिरानगर येथील जनावरे चराईसाठी राजेदहेगाव-इंदिरानगर सीमेवर ३१ मे रोजी नेण्यात आली होती. दुपारनंतर दामोदर इटनकर यांच्या शेतशिवारालगत शेळी चरत असतांना अजगाराला आपले खाद्य मिळाले आहेत. या आशेने १० किलो वजनाची शेळीला गिळकृंत केले. तिला गिळायला सुरुवात केली असता इतर जनावरे जोरजोराने हंबरायला लागली. गाईराख्याने ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरविली. ठाणा येथील सर्पमित्र नदीम कलाम शेख याला पाचारण करण्यात आले. नदीमने आपल्या जीवाची पर्वा न करता नाल्यात उतरुण शेळीला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अजगराला तोंडापासून दोन फुट पकडताच बकरीला खाली सोडले. मात्र तोपर्यंत शेळीचा मृत्यू झाला होता. याची सुचना लगेच वनविभागाला देण्यात आली. दोनदिवस वाट पाहले असता वनविभागाचा एकही कर्मचारी अजगराला घेऊन जाण्यास आले नाही. ही एक शोकांतिका म्हणावी लागेल. याउलट नदीम शेख यांनाच अजगराला कोका जंगलात सोडायला सांगितले. लगेच त्या १२ फुट लांबीचा , २२ किलो वजनाचा रॉफटर जातीच्या अजगराला सर्पमित्र नदीम यांनी होमेंद्र भोयर, विशाल पिंपळशेंडे, पवन थोटे यांच्या सोबत चारचाकी वाहनाद्वारे आज ३ जून रोजी दुपारनंतर सुखरुप सोडून देण्यात आले. आतापर्यंत सर्पमित्र नदीम शेख यांनी परिसरातील ३६०० च्या वर विषारी-बिन विषारी सापाला सुखरुप जीवनदान देत, शहापूर झीरी व कोका येथील वनविभागाच्या जंगलात सोडून देण्यात आले.