शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
6
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
7
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
8
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
9
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
10
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
11
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
12
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
13
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
14
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
15
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
16
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
17
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
18
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
19
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
20
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दहा लाख क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 05:00 IST

जिल्ह्यात १ नाेव्हेंबर पासून आधारभूत खरेदी केंद्रावर धान खरेदीला प्रारंभ झाला. ७८ खरेदी केंद्रांना आतापर्यंत मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी ७७ ठिकाणी खरेदी सुरु आहे. अवकाळी पाऊस अतिवृष्टी, महापुराचा फटका झेलत शेतकऱ्यांच्या घरी धान आला आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर हमीभावासह बाेनस मिळत असल्याने शेतकरी आधारभूत केंद्रावरच धान विकत आहे. नाेंदणी करुन धानाची विक्री केली जात आहे.

ठळक मुद्दे११६ काेटींची चुकारे : गाेदाम हाऊसफुल, खरेदी प्रभावित, शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पणन महासंघाच्यावतीने आधारभूत केंद्रावर आतापर्यंत १० लाख ७९ हजार ८८४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली असून या धानाची किंमत २०१ काेटी ७२ लाख २३ हजार ४६१ रुपये आहे. यापैकी ११६ काेटी २ लाख ३१ हजार ६६८ रुपयांचे चुकारे  शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. आता ८५ काेटी ६९ लाख ९१ हजार ७९३ रुपयांचे चुकाने बाकी आहेत.  जिल्ह्यातील बहुतांश गाेदाम हाऊसफुल झाले असून धान ठेवायलाही जागा नाही. परिणामी अनेक  ठिकाणी धान खरेदी प्रभावित झाली आहे.
जिल्ह्यात १ नाेव्हेंबर पासून आधारभूत खरेदी केंद्रावर धान खरेदीला प्रारंभ झाला. ७८ खरेदी केंद्रांना आतापर्यंत मंजूरी देण्यात आली असून त्यापैकी ७७ ठिकाणी खरेदी सुरु आहे. अवकाळी पाऊस अतिवृष्टी, महापुराचा फटका झेलत शेतकऱ्यांच्या घरी धान आला आहे. आधारभूत खरेदी केंद्रावर हमीभावासह बाेनस मिळत असल्याने शेतकरी आधारभूत केंद्रावरच धान विकत आहे. नाेंदणी करुन धानाची विक्री केली जात आहे. जिल्ह्यातील ७७ केंद्रावर आतापर्यंत १० लाख ७९ हजार ८८४ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. यात भंडारा तालुका ७७ हजार ७९ क्विंटल, माेहाडी १ लाख ६२ हजार २९४ क्विंटल, तुमसर २ लाख ५ हजार ८६२ क्विंटल, लाखनी १ लाख ८० हजार ४३८ क्विंटल, साकाेली १ लाख ५५ हजार ४६७ क्विंटल, लाखांदूर २ लाख ९ हजार २४५ क्विंटल आणि पवनी तालुक्यात ८९ हजार ४९४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आधारभूत खरेदी केंद्रावर आतापर्यंत केवळ सर्वसाधारण प्रतीचा धान खरेदी करण्यात आला आहे. उच्चप्रतीचा धान अद्यापपर्यंत एकाही शेतकऱ्याने येथे विक्रीसाठी आणला नाही. 
शेतकऱ्यांनी आतापर्यंत विकलेल्या धानाची किंमत २०१ काेटी ७२ लाख २३  हजार ४६१ रुपये आहे. ही रक्कम आधारभूत दरानुसार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ११६ काेटी २ लाख ३१ हजार ६६८ रुपये वळते करण्यात आले आहे. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना धानाच्या पैशाने माेठा आधार दिला आहे. उर्वरित ८५ काेटी ६९ लाख ९१ हजार ७९३ रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वळते केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात सध्या अस्तित्वात असलेले बहुतांश गाेदाम फुल्ल झाले आहे. धान ठेवायलाही जागा नाही. त्यामुळे धान खरेदी प्रभावित झाली आहे. मिल मालकांना तात्काळ भरडाईचे आदेश देवून गाेदाम खाली करावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.

परप्रांतातील धानाला बंदी
 महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा धानाला बाेनससह अधिक रक्कम मिळते. १८६८ रुपये हमीदर आणि ७०० रुपये बाेनस असे २५६८ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, छत्तीसगढच नव्हे तर बिहार राज्यातून माेठ्या प्रमाणात जिल्ह्यात धान विक्रीसाठी येत हाेता. अनेक व्यापारी कमी किमतीत धान खरेदी करुन महाराष्ट्रातील आधारभूत केंद्रावर शेतकऱ्यांच्या  नावाने विकत हाेते. हा प्रकार उघडकीस आला. चार वाहनचालकांवर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने परप्रांतातून धानाला बंदी घालून सर्वसीमा सील केल्या. हा प्रकार शाेधून काढण्यासाठी पथकाचे गठण करण्यात आले आहे. केवळ राज्यातील शेतकऱ्यांचाच धान खरेदी केला जावा, अशा सक्त सुचना देण्यात आल्या.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड