शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 738 कोटी रुपयांचा 38 लाख क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 05:00 IST

जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आधारभूत केंद्रावर धान खरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील १८२ केंद्रांवर धान खरेदी करण्यात आली. विविध समस्यांचा सामना करीत शेतकऱ्यांनी आपला धान विकला. मंगळवार ८ फेब्रुवारीपासून आधारभूत धान खरेदी बंद करण्यात आली असून मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ३८ लाख ६ हजार ७०३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात खरीप हंगामात आधारभूत केंद्रावर ३८ लाख ६ हजार ७०० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या धानाची किंमत ७३८ कोटी ५० लाख ३ हजार ९९४ रुपये असून जिल्ह्यातील १ लाख ३० हजार ४५० शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली आहे.जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आधारभूत केंद्रावर धान खरेदीला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील १८२ केंद्रांवर धान खरेदी करण्यात आली. विविध समस्यांचा सामना करीत शेतकऱ्यांनी आपला धान विकला. मंगळवार ८ फेब्रुवारीपासून आधारभूत धान खरेदी बंद करण्यात आली असून मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. जिल्ह्यात आतापर्यंत ३८ लाख ६ हजार ७०३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. सर्व धान सर्वसाधारण ग्रेडचा असून १९४० रुपये प्रतीक्विंटल या हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. सर्वाधिक धान खरेदी तुमसर तालुक्यात ७ लाख २४ हजार ८२५ क्विंटल झाली असून सर्वात कमी खरेदी साकोली तालुक्यात ४ लाख ४३ हजार २०४ क्विंटल आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे धानाची विक्री झाली असून त्यामुळे आता शासकीय धान खरेदीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे.

४५७ कोटी रुपयांचे चुकारे थकीत- जिल्ह्यात ७३८ कोटी ५० लाख ३ हजार ९९४ रुपयांची आधारभूत किमतीने धान खरेदी झाली आहे. यापैकी २८१ कोटी ५९ लाख ९७ हजार १६ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र अद्यापही ४५६ कोटी ९० लाख ६ हजार ९७८ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातील असे सांगण्यात येत आहे.बोनसच्या प्रश्नाला वाटाण्याच्या अक्षता- आधारभूत केंद्रावर विकलेल्या धानाला बोनस मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. लोकप्रतिनिधींनी सुरुवातीला बोनस दिला जाईल असे जाहीर केले होते. मात्र आता धान खरेदी संपली तरी अद्याप बोनसचा कुठेही उल्लेख होत नाही. बोनस ऐवजी शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी दिली जाईल असे सांगण्यात येते. विशेष म्हणजे गतवर्षी क्विंटलमागे ७०० रुपये बोनस मिळाला होता.

 

टॅग्स :market yardमार्केट यार्डFarmerशेतकरी