लोकमत दीपोत्सवाचे थाटात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 05:00 IST2020-11-14T05:00:00+5:302020-11-14T05:00:18+5:30

समाजातील सर्व घटकांनी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी हा दिवाळी विशेषांक आवर्जून वाचायला हवा, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.  जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले, अत्यंत ज्ञानवर्धक माहिती असून लोकमतने आपल्या परंपरेला साजेसा अंक वाचकांसाठी आणल्याचे सांगितले.

Publication of Lokmat Dipotsava | लोकमत दीपोत्सवाचे थाटात प्रकाशन

लोकमत दीपोत्सवाचे थाटात प्रकाशन

ठळक मुद्देआमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
 ज्ञानवर्धक माहितीने आशय संपन्न असलेल्या लोकमत दिपोत्सवाचे प्रकाशन भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या हस्ते शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते उपस्थित होते.
लोकमतचा दिवाळी अंक सर्वार्थाने आशय संपन्न आहे. समाजातील विविध घडामोडीवर वास्तववादी लिखान आहे.

समाजातील सर्व घटकांनी, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी हा दिवाळी विशेषांक आवर्जून वाचायला हवा, असे प्रतिपादन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केले.  जिल्हाधिकारी संदीप कदम म्हणाले, अत्यंत ज्ञानवर्धक माहिती असून लोकमतने आपल्या परंपरेला साजेसा अंक वाचकांसाठी आणल्याचे सांगितले. कार्यक्रमाला लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंदे, शाखा व्यवस्थापक मोहन धवड, प्रसार अधिकारी विजय बन्सोड उपस्थित होते. 

Web Title: Publication of Lokmat Dipotsava