तुमसरात उरी हल्याचा निषेध

By Admin | Updated: September 26, 2016 00:55 IST2016-09-26T00:55:57+5:302016-09-26T00:55:57+5:30

पाकिस्तानी आतंकवादयांनी उरी येथील मिलिटरी शिबिरावर केलेल्या हल्यामध्ये १८ भारतीय जवान शहीद झाले.

Prohibition of Uri Haze all over you | तुमसरात उरी हल्याचा निषेध

तुमसरात उरी हल्याचा निषेध

शिवसेनेचा पुढाकार : शरीफ यांचा पुतळा जाळला
तुमसर : पाकिस्तानी आतंकवादयांनी उरी येथील मिलिटरी शिबिरावर केलेल्या हल्यामध्ये १८ भारतीय जवान शहीद झाले. त्या हल्याच्या निषेधार्थ देशवासियांनी भारत देशातील कोण्या कोप?्यापर्यंत दुखद अंतकरणातुन निषेध व्यक्त केला.
तुमसर येथे सुद्धा शिवसेना तर्फे नविन बसटॉप समोर शेकडो शिवसैनिकांनी पाकिस्थानाचा विरोध करुन नवाज शरीफ यांचा पुतळयाला दहन केला व जोर जोराने पाकिस्थाना मुदार्बाद, नवाज शरीफ मुदार्बात चे नारे लावले, व भारत माता की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नवाज शरीफ यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले, तालुका प्रमुख नरेश उचिबगले, उपजिल्हा प्रमुख लालू हिसारिया, शहर प्रमुख कमलाकर निखाडे, शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष भास्कर भोयर, युवसेना शहर प्रमुख अक्षय ढेंगे, अमित मेश्राम, तालुका कामगार सेना प्रमुख मनोहर जांगडे, जेष्ठ शिवसैनिक सुधाकर कारेमोरे, महेश पटले, विभाग प्रमुख मोहनिश साठवने, ओमेश्वर वासनिक, अश्विन जगने, नरेश टेंभरे, प्रकाश चौधरी, बंटी नेवारे, मनोज चौबे, श्रीकांत भोंडेकर, राजन तांडेकर, रविदास कनोजे, आशीष हम्बडे, राकेश गौर, आशीष धुर्वे,कलीम खान, छोटू ठाकरे, योगेश टेंभरे, महिपाल पटले, प्रकाश पारधी, शिवा चौधरी सह असंख्य शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Prohibition of Uri Haze all over you