शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

खासगी माध्यमिक शिक्षकांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 20, 2014 23:08 IST

आॅक्टोबर महिन्यात दिवाळीचा सण असल्यामुळे दिवाळीपूर्वी म्हणजेच २० तारखेपर्यंत आॅक्टोबरचे वेतन देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता.

सानगडी : आॅक्टोबर महिन्यात दिवाळीचा सण असल्यामुळे दिवाळीपूर्वी म्हणजेच २० तारखेपर्यंत आॅक्टोबरचे वेतन देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. त्याअनुषंगाने कार्यवाहीसुद्धा करण्यात आली. परंतु अचानक अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न झाल्यामुळे अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे वेतन जुन्या पद्धतीने व अन्य शिक्षकांचे वेतन आॅनलाईन पाठ विण्याबाबद १४ आॅक्टोबरला शासनाने आदेश काढले. परंतु ७ तारखेपुर्वीच प्रत्येक शाळेने शिक्षकांचे बिल अतिरिक्त झाले. त्या कर्मचाऱ्यासह वेतन पथकाला पाठविले. बिल पारित सुद्धा झाले होते. परंतु १४ आॅक्टोबरचा आदेश धडकताच वेतन पथकाने जिल्ह्यातील खासगी माध्यमिक शाळेचे वेतन बिल परत करण्यास सुरूवात केली. जर हा शासनाचा आदेश ३० सप्टेंबरपर्यंत निघाला असता तर कार्यवाही करणे सोयीस्कर झाले असते. अवघ्या चार दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आहे. चार दिवसात कार्यवाही करून अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्याचे वेतन बिल जुन्या पद्धतीने व इतर कर्मचाऱ्याचे वेतन बिल आॅनलाईन पद्धतीने पाठविणे शक्य नसल्याने खाजगी माध्यमिक शिक्षकांची व अन्य कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार हे नक्की.ही माहिती शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच डॉ. उल्हास फडके, अशोक तेलपांडे, अशोक वैद्य, जिल्हा सचिव अंगेश बेलपांडे यांच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन व वित्त अधिकाऱ्यांशी आॅक्टोबरला वेतन देण्याबाबद व शासनाने काढलेला आदेश नोव्हेंबर पासून लागू करण्याबाबद चर्चा करण्यात आली. सदर शिष्ठमंडळात परिषदेणे तालुका अध्यक्ष पुरूषोत्तम डोमळे, कार्यवाह अमोल हलमारे, जयंत झोडे, कांचन गहाणे, महादेव सोनवाने, बोपचे, बोडखे यासह प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)