शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांनी 'हाऊसफुल्ल'

By admin | Updated: September 20, 2014 23:45 IST

यावर्षीचा डेंग्यूचा पहिला बळी पालोरा येथे गेला. संपूर्ण परिसरात डेंग्यूचा उद्रेक झाला. डेंग्यूची शंका खासगी दवाखान्याने दार ठोठावून रुग्ण खर्च करीत आहे. डॉक्टरही नागरिकांच्या धास्तीचा

करडी (पालोरा) : यावर्षीचा डेंग्यूचा पहिला बळी पालोरा येथे गेला. संपूर्ण परिसरात डेंग्यूचा उद्रेक झाला. डेंग्यूची शंका खासगी दवाखान्याने दार ठोठावून रुग्ण खर्च करीत आहे. डॉक्टरही नागरिकांच्या धास्तीचा फायदा उचलताना दिसून येत आहे. करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रोजच रुग्णांची प्रचंड गर्दी असते. रुग्णांनी केंद्र हाऊसफुल झाल्याचे दिसून येते. हिच परिस्थिती संपूर्ण मोहाडी तालुक्यातही आहे.जिल्हा आरोग्य विभागाचे वतीने डेंग्यूच्या आजाराने एकच रुग्ण दगावल्याचे सांगण्यात येत आहे. जाीणवपूर्वक खरी आकडेवारी लपविली जात असून प्रमाण मोठे आहे. डेंग्यूच्या आजाराशिवाय अज्ञात आजाराने सुद्धा डोके वर काढले आहेत. थंडी लागून ताप, खोकला, डोकेदुखी, ताप, पोटावर व छातीवर सुजन आदी व अन्य आजारांच्या रुग्णांची संख्याही अधिक आहे. वातावरणाच्या बदलाचा परिणाम म्हणून या आजारांकडे बघितले जाते. बदलत्या वातावरणामुळे बालकांची रोग प्रतिकार क्षमता कमी असल्याने सर्वाधिक बाल रुग्ण रुग्णालयात दिसून येतात. मोहाडी तालुक्यात ओपीडीमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांत बालकांचे प्रमाण अधिक आहे. त्याचा अनपेक्षित फटका शाळांमधील मुलांच्या उपस्थितीवर झाला आहे. नागरिकांनी आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी उघड्यावरील पदार्थ खाण्याचे टाळावे, पाण्याचे टाके स्वच्छ करून एक दिवस कोरडे ठेवावे, घराशेजारील पाण्याचे डबके तसेच स्रानगृहाच्या खड्ड्यात ब्लिचिंग पावडर किंवा तेलाची फवारणी करावी. नाल्यामध्ये कचरा न घालता खड्ड्यांमध्ये कचरा घालावा. (वार्ताहर)