शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवा कोलमडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 05:00 IST

लाखनी तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या व  चुलबंद नदी खोरे तथा जंगली भूप्रदेश अशी ख्यातीप्राप्त मुरमाडी/तूप परिसरात दारिद्र्य रेषेखालील, अल्प - अत्यल्प शेतकरी तथा भूमिहीन शेतमजूर कुटुंबांची संख्या अधिक असल्याने मागास प्रदेश म्हणून ओळख आहे. या कुटुंबांना नाममात्र शुल्कात आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली.

चंदन मोटघरेलोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : आरोग्य सेवेचा समावेश आवश्यक सेवेत होत असला तरी, शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचली नसल्याचा प्रत्यत मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्रात आला.  मंजूर ३६ पदांपैकी  आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व इतर १३ पदे रिक्त असल्याने रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नाही. लाखनी तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या व  चुलबंद नदी खोरे तथा जंगली भूप्रदेश अशी ख्यातीप्राप्त मुरमाडी/तूप परिसरात दारिद्र्य रेषेखालील, अल्प - अत्यल्प शेतकरी तथा भूमिहीन शेतमजूर कुटुंबांची संख्या अधिक असल्याने मागास प्रदेश म्हणून ओळख आहे. या कुटुंबांना नाममात्र शुल्कात आरोग्य सेवेचा लाभ मिळावा, याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात २ आयुर्वेदिक रुग्णालये, ६ आरोग्य उपकेंद्रे आणि २९ गावे समाविष्ट असून ३० हजार लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी या आरोग्य केंद्रांवर देण्यात आली असली तरी, रिक्त पदांमुळे पाहिजे त्या प्रमाणात सेवा दिली जात नाही, असे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे म्हणणे आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांची ३६ पदे मंजूर असली तरी, १ आरोग्य अधिकारी, ५ आरोग्य सेविका, ४ आरोग्य सेवक पुरुष, परिचर २  आणि अंशकालीन महिला परिचर १ अशी एकूण १३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते.  इच्छा असूनही आरोग्य सेवा मात्र देता येत नसल्याचे दिसते. 

ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देणे आवश्यक- मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत निम्मी गावे चुलबंद नदीकाठावर आहेत. त्यामुळे पावसाळ्यात जलजन्य आजार तसेच या परिसरातून लाखांदूर व पवनी तालुक्यास जोडणारा इतर जिल्हा मार्ग गेल्याने अपघातांचे प्रमाणही अधिक आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी होणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. पण या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचाराचीच सोय असल्याने पुढील उपचारासाठी लाखनी किंवा साकोलीला न्यावे लागते. त्यामुळे रुग्ण दगावण्याचा धोका असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देणे गरजेचे बनले आहे.

उपकेंद्रांची परिस्थिती गंभीर- मुरमाडी/तूप प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ६ उपकेंद्रे येत असली तरी खराशी, पालांदूर, मरेगाव, कोलारी व दीघोरी येथील आरोग्य सेविकेचे पद रिक्त असल्यामुळे स्तनदा व गरोदर माता, तसेच अंगणवाडीतील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल