भर पावसात पोलीस पोहचले, खड्डा खोदला अन् पोत्यात निघाले मृत श्वान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 05:00 AM2020-07-12T05:00:00+5:302020-07-12T05:00:58+5:30

भंडारा शहर तसे शांत शहर म्हणून ओळखले जाते. परंतु अलिकडे घडलेल्या काही घटनांनी शांतता भंग होऊ पाहत आहे. पोलीस अशा गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून आहेत. असाच शुक्रवारी एका व्यक्तीने बैलबाजारालगत एका खड्ड्यात मृतदेह पुरल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाजे, हवालदार काटेखाये, खेर, चकोले घटनास्थळाकडे निघाले. शहरात धो-धो पाऊस सुरु होता.

In the pouring rain, the police arrived, dug a pit, and left the dead dog behind | भर पावसात पोलीस पोहचले, खड्डा खोदला अन् पोत्यात निघाले मृत श्वान

भर पावसात पोलीस पोहचले, खड्डा खोदला अन् पोत्यात निघाले मृत श्वान

Next
ठळक मुद्देभंडारातील बैल बाजारानजीकचा प्रकार । पोलिसांची तासभर दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दुपारी २ वाजताची वेळ. पोलीस ठाण्यातील फोन खणाणला. पलिकडून उत्तर आले बैलबाजार परिसरात कुणाचा तरी मृतदेह पुरलेला आहे. पोलिसांचे कान टवकारले. तात्काळ पथक रवाना झाले. भर पावसात खड्डा खोदणे सुरु झाले. आतमध्ये मोठे पोते दिसू लागले. नक्कीच कुणाचा तरी मृतदेह असावा या निष्कर्षाप्रत पोलिसही पोहचले. परिसरातील नागरिकांची उत्कंठाही शिगेला पोहचली. कुणाचा मृतदेह असेल, कुणी खून तर केला नसेल ना अशी चर्चा सुरु झाली. मात्र काही वेळातच पोत्याचे बांधलेले तोंड सोडले आणि त्यातून निघाले मृत श्वान. या प्रकारात पोलिसांची मात्र भर पावसात चांगलीच दमछाक झाली.
भंडारा शहर तसे शांत शहर म्हणून ओळखले जाते. परंतु अलिकडे घडलेल्या काही घटनांनी शांतता भंग होऊ पाहत आहे. पोलीस अशा गुन्हेगारांवर करडी नजर ठेवून आहेत. असाच शुक्रवारी एका व्यक्तीने बैलबाजारालगत एका खड्ड्यात मृतदेह पुरल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाजे, हवालदार काटेखाये, खेर, चकोले घटनास्थळाकडे निघाले. शहरात धो-धो पाऊस सुरु होता. भर पावसात पोलीस पथक बैलबाजार परिसरात पोहचले. महसूलचे नायब तहसीलदारही दाखल झाले. खड्डा खोदण्यास प्रारंभ झाला. परिसरातील नागरिकांनीही गर्दी केली. शंकांचे पेव फुटले. पोलीस पथक खड्डा खोदत असताना मोठे पोते खड्ड्यात दिसून आले. नक्कीच काहीतरी काळेबेरे असावे असा त्यांचा कयास होता. काही वेळात पोते वर काढण्यात आले. त्या पोत्याचे तोंड सोडले आणि पाहते तर काय? आतमध्ये एक मृत श्वान.

सदर श्वान कुणाचा तरी पाळीव असावा. घरमालकाचे त्याच्यावर जीवापाड प्रेम असावे. वृद्धापकाळाने म्हणा की आजाराने श्वान मृत पावले असेल. आपल्या लाडक्या श्वानाचा मृत्यू झाल्याने त्याचा अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले असावे. त्यातूनच एका मोठ्या पोत्यात श्वानाला बांधून आणि खड्डा खोदून त्यात पुरले असावे. हा प्रकार लक्षात आला आणि पोलिसांना माहिती दिली. अन् पुढे घडले नाट्य.

Web Title: In the pouring rain, the police arrived, dug a pit, and left the dead dog behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस