गायमुख मार्गावरील खड्ड्यांनी भाविक त्रासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:00 AM2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:45+5:30

भाविकांच्या मागणीमुळे गायमुखला १९९६ साली ‘क’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळाला. या तीर्थस्थळाच्या विकासासाठी प्रथम टप्प्यात १० लाख नंतर ५० लाख रुपये शासनाकडून मंजूर झाले. यातून काही विकास कामे करण्यात आली. परंतु पर्यटनाची कामे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती तशी न झाल्याने आजही गायमुख तीर्थक्षेत्राचा विकास होऊ शकलेला नाही.

The potholes on the road were disturbed | गायमुख मार्गावरील खड्ड्यांनी भाविक त्रासले

गायमुख मार्गावरील खड्ड्यांनी भाविक त्रासले

Next
ठळक मुद्देअपघाताची भीती : पर्यटकांची संख्या रोडावली

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दरवर्षी महाशिवरात्रीला जिल्ह्यातील गायमुख येथे विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र सदर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करीत प्रवास करावा लागत आहे. येथे असणाऱ्या अनेक गैरसोयींमुळे तसेच खड्डेमय रस्त्यांमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे.
भाविकांच्या मागणीमुळे गायमुखला १९९६ साली ‘क’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळाला. या तीर्थस्थळाच्या विकासासाठी प्रथम टप्प्यात १० लाख नंतर ५० लाख रुपये शासनाकडून मंजूर झाले. यातून काही विकास कामे करण्यात आली. परंतु पर्यटनाची कामे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती तशी न झाल्याने आजही गायमुख तीर्थक्षेत्राचा विकास होऊ शकलेला नाही. येथे येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांना विश्रामगृह उभारण्यात आले, पण तेथे विशेष सुविधा उपलब्ध नसल्याने इकडे पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. दूरदूरवरून येणाऱ्या भाविकांना अरुंद व खड्डेमय रस्त्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नुकतेच जांब ते गायमुख, मिटेवानी ते आंबागडपर्यंत मुरुम टाकण्याचे काम करण्यात आले. याचा महाशिवरात्रीच्या पर्वावर येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास होणार आहे.
याकडे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे भाविकांतून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाबद्दल तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महाशिवरात्रीपुर्वी त्वरीत रस्त्याचे काम करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

निसर्गरम्य गायमुख
निसर्गरम्य परिसरात असलेले तीर्थस्थान म्हणून गायमुखची ख्याती आहे. येथे आलेले भाविक चौरागडच्या पर्वतटोकावरून असलेले अप्रतीम निसर्गसौंदर्य न्याहाळतात.

Web Title: The potholes on the road were disturbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.