वनविभागाकडून तपास भरकटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:00 AM2020-07-04T05:00:00+5:302020-07-04T05:00:40+5:30

साकोली तालुक्यातील खैरी पिंडकेपार शेतशिवारात शेतकुंपनात वीज प्रवाह सोडून तीन महिन्यापुर्वी बिबट्याची शिकार झाली. त्याचे कातडे विकण्याची शिकाऱ्यांची तयारी सुरू होती. ग्राहकांचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली. बनावट ग्राहक पाठवून कातडीसह सुरूवातीला चौघांना आणि नंतर याप्रकरणातील सुत्रधार दोन भावांना अटक करण्यात आली.

Possibility of derailment of investigation by Forest Department | वनविभागाकडून तपास भरकटण्याची शक्यता

वनविभागाकडून तपास भरकटण्याची शक्यता

Next
ठळक मुद्देबिबट कातडीचे प्रकरण : वन्यजीवांच्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह

संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : वनविभागाला थांगपत्ता नसताना पोलिसांनी बिबट कातडी विकण्याच्या प्रयत्नातील आरोपींना जेरबंद केले. त्यानंतर याप्रकरणाचा तपास वनविभागाकडे देण्यात आला. मात्र आता हा तपास भरकटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बिबटाचे कातडे नागपूर येथील व्यक्तींना विकण्याचा सौदा या आरोपींनी केला होता. मात्र तीन दिवसांपासून वनविभागाच्या हाती काहीही लागले नाही. हाच तपास पोलिसांकडे असता तर या प्रकरणाचे धागेदोरे गवसून मोठे रॅकेट पुढे आले असते.
साकोली तालुक्यातील खैरी पिंडकेपार शेतशिवारात शेतकुंपनात वीज प्रवाह सोडून तीन महिन्यापुर्वी बिबट्याची शिकार झाली. त्याचे कातडे विकण्याची शिकाऱ्यांची तयारी सुरू होती. ग्राहकांचा शोध सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली. बनावट ग्राहक पाठवून कातडीसह सुरूवातीला चौघांना आणि नंतर याप्रकरणातील सुत्रधार दोन भावांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून बिबट्याचा जबडा जप्त करण्यात आला. हा सर्व प्रकार सुरू असताना वनविभागाला मात्र कोणतीही माहिती नव्हती. सदर प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी हात वर केले. आम्हाला काहीच माहित नाही, असे सांगून सुरूवातीला जबाबदारी झटकण्याची तयार केली. मात्र नियमानुसार या प्रकरणाचा तपास वनविभागाकडे आला. वनविभागाने केवळ सोपस्कार पार पाडून आरोपींना ताब्यात घेतले आणि न्यायालयापुढे हजर करून त्यांची वनकोठडी मिळविली. मात्र शिकाºयांना बोलते करण्यात अद्यापही यश आले नाही.
रंजीत रामटेके आणि चंद्रशेखर रामटेके या दोन भावंडांनी बिबट्याची कातडी काढून ग्राहकांचा शोध सुरू केला. त्यात त्यांना दुर्याेधन गहाणे, योगेश्वर गहाणे, लक्ष्मीकांत नान्हे, पंकज दिघोरे यांनी सहकार्य केले. नागपूर येथील व्यक्तीला या कातडीची किंमत २० कोटी रूपये सांगण्यात आली होती. पाच कोटी रूपयात सौदा ठरला होता. मात्र त्यांचा डाव मोडून काढला. साधारण व्यक्ती एवढी मोठी रक्कम बिबट्याच्या कातडीवर कशाला खर्च करणार, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. नागपूरच्या त्या व्यक्तींचा शोध घेतल्यास कातडी तस्करी प्रकरणाचे मोठे रॅकेट पुढे येण्याची शक्यता आहे.

नेमकी शिकार झाली केव्हा?
शिकाºयांच्या अटकेनंतर मार्च महिन्यात लॉकडाऊनच्या काळात तार कुंपणात वीज प्रवाह सोडून बिबट्याची शिकार केल्याची कबूली दिली. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात पोलिसांचा चोख बंदोबस्त साकोली तालुक्यातील गावागावात होता. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात होती. त्यामुळे या शिकाऱ्यांनी बिबट्याच्या शिकारीनंतर कातडे आणि जबडा आपल्या घरापर्यंत कसा आणला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात शिकार केव्हा झाली याचीही माहिती अद्यापपर्यंत वनविभागाला आरोपींकडून काढता आली नाही. आरोपी उच्च शिक्षित असून तल्लख बुद्धीचे आहेत. त्यामुहे त्यांच्याकडून हवी ती माहिती काढणे वनविभागाला शक्य होईल काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

बिबट्यांची संख्या किती?
साकोली तालुक्यात नागझिरा अभयारन्याची सीमा आहे. या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे. तसेच तालुक्यात ऊसाची लागवडही होत असल्याने त्यातही बिबटे आढळून येत आहे. परंतु बिबट्यांची संख्या नेमकी किती याचा आकडा आजही वनविभागाकडे नाही. दरवर्षी बौद्ध पोर्णिमेला होणारी जनगणना यावर्षी लॉकडाऊनमुळे झालीच नाही. त्यामुळे बिबट्याची संख्या किती हेही कळू शकले नाही.

Web Title: Possibility of derailment of investigation by Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.