शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

हरीण शिकारप्रकरणी एक ताब्यात

By admin | Updated: October 15, 2016 00:28 IST

हरणाची शिकार केल्यानंतर त्याचा मांसावर ताव मारण्यासाठी आणलेल्या मांसासह एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

भंडारा वनविभागाची कारवाई : मुख्य आरोपीच्या शोधात पथक रवानाभंडारा : हरणाची शिकार केल्यानंतर त्याचा मांसावर ताव मारण्यासाठी आणलेल्या मांसासह एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी २ वाजताच्या सुमारास आंबाडी येथे केली. भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या आंबाडी येथील राहूल श्रीराम भुरे (२६) असे वन्यप्राण्यांच्या मासांसह चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. राहूल याच्या घराचे बांधकाम सुरु आहे. दरम्यान कामावर मजूर असताना दुपारच्या सुमारास राहूलने वन्यप्राण्याच्या शिकारीचे मांस भाजी करण्यासाठी आणले. वन्यप्राण्याचे मांस असल्याने व वनविभागाच्या कारवाईच्या भितीने सदर मांसाची पिशवी घरालगतच्या संरक्षण भिंतीजवळील झुडपात दडवून ठेवली. ही बाब घराचे बांधकाम करणाऱ्या मजूरांच्या लक्षात आली. त्यामुळे त्यानी राहूलला विचारणा केली असता. त्याने हरणाच्या शिकारीचे मांस असल्याचे मजुरांना सांगितले. यावेळी तेथून गावातीलच एक इसम जात होता. त्याने ही बाब लगेच भंडारा वनपरिक्षेत्राधिकारी डब्ल्यू. आर. खान यांना भ्रमणध्वनीवर सदर युवकाकडे वन्यप्राण्याचे मांस असल्याची सुचना दिली. यावरुन खान यांनी यांचे अधिनस्थ क्षेत्र सहायक गौरी नेवारे, क्षेत्र सहायक व्ही. टी. बागडे, वनपाल यु. बी. हटवार, बीटरक्षक टी. एच. घूले, बिटरक्षक आर. बी. पडोळे यांना आंबाडी गावात पोहचवून कारवाई करण्याचे निर्देश दिले. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून व खान यांच्या निर्देशानुसार वनविभागाचे पथक आंबाडीतील राहूलच्या घरी दाखल झाले. यावेळी त्यांनी त्याच्याकडून वन्यप्राण्याचे शिकारीचे मांस जप्त केले. दरम्यान सदर मांसाची माहिती त्याच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला असता राहूलने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यावर वनविभागाच्या पथकाने त्याला हिसका दाखविताच राहूलने सदर मांस नेरला येथून आणल्याची कबूली दिली. याप्रकरणी अधिक चौकशीसाठी वनविभागाने राहूलला ताब्यात घेतले आहे. त्याच्या माहितीवरुन रात्री उशिरा वनविभाच्या पथकाने नेरला येथे शिकार करणाऱ्या इसमाच्या घरी छापा घालण्याची तयारी चालविली होती.या प्रकरणाची कारवाई सुरुच आहे. सदर कारवाईत बीटरक्षक वर्षा दराडे, वनरक्षक व्ही. ए. नान्हे, वनरक्षक एस. एम. रामटेके, वाहनचालक अनिल शेडके, राजु वंजारी, वनपाल पप्पू सय्यद आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)नेरलात वनपथक दाखल या शिकार प्रकरणी नेरला येथून वन्यप्राण्याचे मांस आणल्याची कबुली राहूलने दिली. नेरला हे अड्याळ वनपरिक्षेत्रात येते. येथील शिकाऱ्यांच्या घरांवर छापा घालण्यासाठी भंडारा वनपरिक्षेत्राअधिकारी खान यांनी उपवनसंरक्षक वर्मा व सहायक वनसंरक्षक चोपकर यांचे मार्गदर्शन घेतले असून यांच्या निर्देशानुसार रात्री उशिरा नेरला येथे छापा घालण्यासाठी पथक रवाना केले.आंबाडी येथील राहूल भुरे याच्याकडे वन्यप्राण्याचे एक किलो मांस सापडले. मात्र सदर मांस हरिणाचे किंवा अन्य कुठल्या वन्यप्राण्याचे आहे. याबाबत अधिकृत सांगता येत नाही. जप्त केलेल्या मांस पशुवैद्यकिय अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात तपासणीकरिता नागपूर येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत आहे. प्रयोगशाळेतील अहवालानंतरच मांसाबाबद अधिकृत सांगता येईल. राहूलला चौकशीकरिता ताब्यात घेतले आहे.- डब्ल्यू. आर. खान, वनपरिक्षेत्राधिकारी, भंडारा