शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

परिसीमनानंतर बदलली राजकीय समीकरणे

By admin | Updated: September 13, 2014 01:05 IST

मागील निवडणुकीत उमेदवारी मिळाली ज्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती त्यांनी यावेळी चांगलीच कंबर कसलेली आहे.

भंडारा : मागील निवडणुकीत उमेदवारी मिळाली ज्यांना उमेदवारी मिळालेली नव्हती त्यांनी यावेळी चांगलीच कंबर कसलेली आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी सर्वच पक्षात रस्सीखेच सुरू आहे. प्रत्येकच दावेदार नशिब आजमाविण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही सर्व घडामोड परिसीमनानंतर बदलली. सात तालुक्याच्या भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा, अड्याळ, साकोली आणि लाखांदूर असे पाच विधानसभा क्षेत्र होते. परिसीमनानंतर अड्याळ आणि लाखांदूर हे दोन क्षेत्र गोठवून तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा क्षेत्रात पाच विधानसभा क्षेत्र समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे दोन आमदार कमी झाले. परिणामी जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात झपाट्याने एकाचवेळी बदल घडून आला. मतदारांचीही तीन विधानसभा क्षेत्रात विभागण्यात आले. परिसीमनानंतर विधानसभेची पहिली निवडणूक सन २००९ मध्ये झाली. त्यावेळी लोकसभा क्षेत्र भाजपाकडे होता. लोकसभा क्षेत्रावर भाजपचा कब्जा होता. असे असताना २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने खेचून आणल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे वारे सुरू होते. २००९ च्या परिसीमनानंतर लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेस-राकाँ आघाडी आणि भाजपा-शिवसेना युतीमध्ये लढत झाली होती. तुमसर आणि साकोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत झाली होती. भंडारा क्षेत्रात शिवसेना विरुद्ध राकाँ असा मुकाबला रंगला. यात तुमसरात काँग्रेसचे अनिल बावनकर, भंडाऱ्यात शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर तर साकोलीत भाजपाचे नाना पटोले यांनी बाजी मारली होती.आचारसंहिता घोषित होण्याची सर्वच राजकीय पक्ष वाट बघत होता. आज शुक्रवारला आचारसंहिता घोषित झाली तरी अद्यापही आघाडी आणि युतीतील चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यामुळे उमेदवारी अद्याप घोषित झालेली नाही. उमेदवारी मिळविण्यासाठी प्रत्येकच दावेदार जोमाने तयारीला भिडलेला आहे. प्रयत्नांती परमेश्वर असे म्हणत दावेदारांचे पराकोटीचे प्रयत्न सुरू आहेत. आता उमेदवारी कुणाला मिळते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)