शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या मागावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:58 IST

विविध गुन्हे करून पसार झालेल्या तब्बल २६ मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या मागावर तुमसर पोलीस आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध उपाय योजले असून ठाण्याच्या दर्शनी भागात फलक लावून त्यावर आरोपींचे फोटोही लावण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे२६ आरोपींचा शोध : तुमसर ठाण्याच्या दर्शनी भागात लावला आरोपींच्या फोटोसह फलक

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : विविध गुन्हे करून पसार झालेल्या तब्बल २६ मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या मागावर तुमसर पोलीस आहेत. या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी विविध उपाय योजले असून ठाण्याच्या दर्शनी भागात फलक लावून त्यावर आरोपींचे फोटोही लावण्यात आले आहेत.तुमसर तालुक्यातील २६ आरोपी फरार असल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. विविध प्रकारचे गुन्हे करून यातील काही आरोपी तर २५ ते २६ वर्षापासून पसार असल्याचे दिसून येत आहे. आरोपींनी गुन्हा केला. गुन्ह्याची नोंद एकदा पोलीस ठाण्यात झाली तर पोलिसांच्या तावडीतून कुणाचीच सुटका होत नाही. आरोपी कितीही तरबेज असला तरी त्याचा शोध लागतोच. जिल्हा पोलीस प्रशासनाने फरार आरोपी व वॉन्टेड गुन्हेगारांचा छडा लावण्याचे निश्चित केले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फरार आरोपींची यादी तयार करण्यात आली आहे. त्याचे फलक दर्शनी भागात लावण्यात आले असून त्यावर आरोपीचे नाव, ठाण्याचे नाव लिहिण्यात आले आहे.तुमसर पोलीस ठाण्याच्या ठाण्यात दर्शनी भागावर लावण्यता आलेला मोठा बॅनर येणाऱ्या जाणाºयांचे लक्ष वेधून घेत आहे. आरोपी संदर्भात माहिती देणाºयांचे नाव गुप्त ठेवून असे नमूद केले आहे. आरोपींचा आतापर्यंत कसून शोध पोलिसांनी घेतला आहे. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. आरोपीबाबत गृहमंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पोलिसांनी ही मोहिम हाती घेतली आहे. तुमसर शहर संवेदनशील म्हणून जिल्ह्यात ओळखले जाते. तुमसर शहरातून अनेक घटनांनी राज्याचे लक्ष वेधले होते.फरार आरोपी व वॉन्टेड गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आता पोलीस खबºयांची मदत घेत आहे. तुमसर तालुक्यातील तुमसर, आंधळगाव, सिहोरा, गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपींचा २६ पसार आरोपीत समावेश आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ही मोहीम राबविण्यात येत असून यात कितपत यश येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.