शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

फार्मसिस्ट हा रुग्ण व डॉक्टरमधील दुवा

By admin | Updated: September 27, 2016 00:37 IST

मानवाचे सुदृढ आरोग्य हीच सर्वोत्तम देणगी आहे. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करीत असतो.

संयुक्तपणे काढली रॅली : भंडाऱ्यात वर्ल्ड फार्मसिस्ट डे उत्साहातभंडारा : मानवाचे सुदृढ आरोग्य हीच सर्वोत्तम देणगी आहे. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करीत असतो. तरीही आजाराचा विळखा होतच असतो. अशावेळी औषधांचा पुरवठा व उपलब्धतता महत्वाची बाब असते. फार्मसिस्ट हा रुग्ण व डॉक्टर यांच्यामधील महत्वपूर्ण दुवा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी केले.येथील हेमंत सेलीब्रेशन सभागृहात आयोजित वर्ल्ड फार्मसिस्ट डे निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी संपूर्ण शहरातून जनचेतना रॅली काढण्यात आली. सदर कार्यक्रम भंडारा जिल्हा औषधी विक्रेता संघ, महाराष्ट्र फार्मसी आॅफीसर असोसिएशन भंडारा, अनुराग कॉलेज आॅफ फार्मसी वरठी व बाजीराव करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसिस्ट साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. ‘नो युवर फार्मसिस्ट’ ही संकल्पना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देशाने सदर कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात रॅलीने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. श्री गणेश शाळेतून सुरु झालेली रॅली राजीव गांधी चौक ते गांधी चौक व परत राजीव गांधी चौकात परत आली. या नंतर सभागृहात कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मंचकावर नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ.पी.जी. येवले, उपसंचालक डॉ.संजय जैस्वाल, एम.जी. केकतपुरे, सहाय्यक आयुक्त दा.रा. गहाणे, डॉ.मिलिंद उमेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके, हरिश गणेशानी, शशीभूषण नागपुरे, भंडारा जिल्हा औषधी वितरीत संघाचे अध्यक्ष संजय खत्री, प्रशांत रामटेके, मनिष गोटमारे, केशर धारगावे, रामदास कुरंजेकर, प्राचार्य दामोदर गौपाले, संजय निंबार्ते, नितीन शेंदरे, प्राचार्य सचिन लोहे, शिवशंकर बावनकुळे, फार्मसी अधिकारी कळंबे, बावनकर आदी उपस्थित होते. अतिथींनी फार्मसिस्ट यांचे समाजातील महत्व विशद केले. यावेळी गुणवंत फार्मसिस्ट अशा ६० जणांचा सत्कार करण्यात आला. समाजामध्ये औषधांचा होत असलेला दुरुपयोग टाळण्यासाठी औषधी विक्रेत्यांना प्रोत्साहीत करून समाजाप्रती त्यांचे कर्तव्य सांगण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य औषधी विक्रेता संघ मुंबई तर्फे अपग्रेडेशन कीटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता फार्मसिस्ट प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. आभार प्राचार्य लोहे यांनी मानले. (प्रतिनिधी)