शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दंड भरू, पण बाहेर फिरू ; विनाकारण फिरणारेच पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 05:00 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेअंतर्गत आतापर्यंत स्थानिक प्रशासनाने ९८० जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून एक लक्ष ७८ हजार १५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. उल्लेखनीय  म्हणजे   बाहेर फिरणारे आतापर्यंत १६० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याची बाब समोर आली आहे. मात्र आम्ही तपासणीला जात आहोत, दवाखान्यातून आलो  आहोत, अशी कारणे दाखवून वेळ मारून नेली जात आहे.

ठळक मुद्दे९८० जणांवर दंडात्मक कारवाई : एक लक्ष ७८ हजार रुपयांची वसुली

इंद्रपाल कटकवारलोकमत न्युज नेटवर्कभंडारा : कोरोना महामारीला रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन अंतर्गत मोहीम राबवली जात आहे. विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये म्हणून संचारबंदीही लागू करण्यात आली. मात्र अशा स्थितीतही शेकडो नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी भंडारा  पालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. मात्र आम्ही ‘दंड भरू पण बाहेर फिरू’ अशी उदाहरणे समोर येत आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेअंतर्गत आतापर्यंत स्थानिक प्रशासनाने ९८० जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून एक लक्ष ७८ हजार १५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. उल्लेखनीय  म्हणजे   बाहेर फिरणारे आतापर्यंत १६० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याची बाब समोर आली आहे. मात्र आम्ही तपासणीला जात आहोत, दवाखान्यातून आलो  आहोत, अशी कारणे दाखवून वेळ मारून नेली जात आहे. नागरिक ऐकत नसल्याने प्रशासनाने रॅपिड टेस्ट सुरू केली आहे. या कारवाईला झुगारून नागरिक घराबाहेर पडत आहे. शहरातील २७ ठिकाणी निगराणी ठेवण्यात आली असून आतापर्यंत १०१ ठिकाणी भेट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शहरातील २० उपहारगृह,  तीन जिम  तसेच ४५ सार्वजनिक स्थळी कारवाई करीत एकूण ९८० व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.

शहरात २७ ठिकाणी तपासणी 

विनाकारण घराबाहेर फिरताना आढळल्यामुळे प्रशासनाने तपासणीची संख्या वाढविली होती. शहरातील २७ ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या भरारी पथकाने व्यक्तींची कोरोना तपासणी केली आहे. जिल्ह्यातील अन्य तालुका मुख्यालयी अशीच स्थिती पहावयास मिळत आहे. मात्र नागरिकच नियमांना तिलांजली देत असल्याचे दिसून येत आहे. गत दहा दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात असताना नागरिकांचा हलगर्जीपणा अंगलट येऊ शकतो. सध्यातरी ‘नागरिकहो असे का वागता’ असे म्हणण्याची पुन्हा वेळ आली आहे.

तपासणीत कारणे मात्र तीच

शहरातील मुख्य चौकांमध्ये महसूल तथा पोलिस विभागाची पथके तैनात आहेत एखाद्या नागरिकाला अडविल्यास दवाखान्यात किंवा बँकेत किंवा अन्य महत्त्वाच्या कामाला जात असल्याचे सांगण्यात येते मात्र शहानिशा केल्यावर ती व्यक्ती शुल्लक कारणासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे.याबाबत नागरिकांनीच पुढाकार घेण्याची खरी गरज निर्माण झाली आहे, यात शंका नाही.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस