शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल लाभार्थ्यांना थकबाकी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:01 IST

प्रधानमंत्री आवासयोजने अंतर्गत तुमसर शहरातील ४३६४ घरकुलांचा डीपीआर मंजूर झाला, त्यापैकी ३२० लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. अद्यापही चार हजाराच्या वर लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८ पासून जोमाने सुरू झाले. अनेकांनी आपल्या झोपड्या व घरे मोडकळीस काढून भाड्याच्या घरात आसरा घेतला आहे.

ठळक मुद्देप्रशासनाला निवेदन : अनेकांची कार्यालयात पायपीट ,चार हजार लाभार्थी प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पंतप्रधान गृहनिर्माण योजना (शहरी) अंतर्गत घरकुल बांधकाम निधीअभावी अडकून पडली आहेत. कोरोना संकटामुळे घरकुल लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान प्रलंबीत असल्याने तातडीने घरकुल अनुदानाची थकबाकी द्यावी, अशी मागणी भंडारा जिल्हा काँग्रेसचे महासचिव गौरीशंकर मोटघरे यांनी केली आहे.प्रधानमंत्री आवासयोजने अंतर्गत तुमसर शहरातील ४३६४ घरकुलांचा डीपीआर मंजूर झाला, त्यापैकी ३२० लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. अद्यापही चार हजाराच्या वर लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. मंजूर झालेल्या घरकुलाचे बांधकाम नोव्हेंबर २०१८ पासून जोमाने सुरू झाले. अनेकांनी आपल्या झोपड्या व घरे मोडकळीस काढून भाड्याच्या घरात आसरा घेतला आहे. प्रशासनाने मंजूरी दिल्याने घरकुल बांधकाम सुरू केले. आतापर्यंत सर्व लाभार्थ्यांना फक्त एक लाख रुपये प्राप्त झाले आहेत.घरे उभारली आहेत, परंतु पाया घातल्यानंतरही अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठविलेले नाही. त्यामुळे बांधकाम पूर्णपणे थांबले आहे. दुसरा हप्ता घरकुल लाभार्थ्यांना जुलै २०१९ मध्ये प्राप्त झाला होता. राज्य सरकार मार्फत निधी प्राप्त झाला होता. परंतु केंद्र सरकारने अद्याप घरकुल योजनेसाठी निधीची तरतूद केलेली नाही, त्यामुळे लाभार्थ्यांनी सावकाराकडून उसनवार घेऊन घरकुलाचे छत उभारले मात्र आता पावसाळा सुरू झाल्याने प्लास्टंरिंग अभावी घरकुल गळू लागले आहेत, तर कुणी भाड्याच्या घरात आश्रयाला आहेत. घर मालकांना घरभाडे देणेही कठीण झाले आहे लॉकडाऊनमुळे घरकुल लाभार्थ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात निवाऱ्याची समस्या भेडसावत आहे तर दुसरीकडे सावकाराकडून कर्जाची वसुली करण्याकरिता दबाव आणला जात आहे. नगरपरिषद तुमसर येथे लाभार्थ्यांनी चकरा मारूनही निधी प्राप्त होत नसल्याने रोष व्यक्त होत आहे. शासनाने घरभाडे देऊन निवाºयाची व्यवस्था करावी, असे निवेदनातून लाभार्थ्यांनी केली आहे.

प्रधानमंत्री घरकूल योजनेचा शुभारंभ शहरात काही दिवसापूर्वी करण्यात आला. सुरवातीचे दोन हफ्ते लाभार्थ्यांना देवून त्यांना मोठी आशा दाखविण्यात आली मात्र गत वर्षभरापासून घरकुलाचे हप्ते मिळाले नसल्याने लाभार्थी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने वेळीच मदत करावी, अन्यथा आंदोलन पुकारण्यात येईल.- गौरीशंकर मोटघरे, काँग्रेस नेते तुमसर

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना