शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमान योजना रखडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: September 1, 2015 00:29 IST

अनुसूचित जातीमधील भूमिहीन शेतमजूर व नवबौद्धांच्यासबलीकरणासाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली स्वाभिमान योजना नियोजनाअभावी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भूमिहिनांचे स्वप्न भंगणार : लाभार्थी योजनेच्या माहितीपासून वंचितपहेला : अनुसूचित जातीमधील भूमिहीन शेतमजूर व नवबौद्धांच्यासबलीकरणासाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली स्वाभिमान योजना नियोजनाअभावी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य क्रीडा व विशेष सहाय्य विभागान्वये स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर, परित्यक्ता, विधवा, स्त्रियांच्या कुटुंबीयांना शासनाच्या योजनेप्रमाणे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करून योजनेत बसणाऱ्या कुटुंबाला शासनाकडून चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर ओलिताखालील जमीन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार होती. त्यात ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व ५० टक्के रक्कम अनुदानाची या आधारावर ही जमीन उपलब्ध करून देण्यात येणार होती. मात्र ही जमीन विकण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांकडून शासकीय दराप्रमाणे विकत घेण्यात येणार आहे. कर्जाचा भाग वित्तीय संस्था अथवा राष्ट्रीय अनुसूचित जाती व विकास महामंडळ नवी दिल्ली किंवा राष्ट्रीयकृत आणि सहकार बँक या संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात येणार, एनएफडीसी कर्जावर राज्य शासनाची हमी राहील, असे या योजनेचे धोरण आहे. अनेक भूमिहीन नागरिकांनी जिल्ह्यात रीतसर अर्ज सुद्धा केले. परंतु बोटावर मोजण्याइतक्याच भूमिहिनांना या योजनेचा फायदा मिळाला. शासकीय दरामध्ये शेतकरी जमीन विकण्यासाठी तयार नसल्याने भूमिहिनांच्या पदरी निराशाच झाली आहे. पडीक जमीन कसण्यास उपलब्ध करून दिल्यास ती जमीन सर्वदृष्ट्या शेती करण्यास परवडणारी असेल काय, जमीन उपलब्ध झाल्यास ती जमीन कसण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. परिणामी शासनाचे हुकूमशाही धोरण व अधिकाऱ्याकडून भूमिहिनांची होणारी अवहेलना यापुढे स्वाभिमान योजना यशस्वी करण्याचे मोठे आवाहन शासनापुढे आहे. ही योजना सुरू होऊन आता बरीच वर्षे झाली. परंतु आतापर्यंत मोजक्याच भूमिहिनांना शतजमिनी मिळाल्या आहेत. शासनाच्या धोरणानुसार दलितांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजनेची माहिती बऱ्याच दलित लाभार्थ्यांना नाही. त्यामुळे या योजनेवर अनेक प्रश्नचिन्ह लागले आहेत. (वार्ताहर)