शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने धान उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

दुपारच्यावेळी झालेल्या या पावसाने हाताशी आलेला धानाचा घास हिरावून नेला. सध्या शेतात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र पाऊस कोसळत असल्याने शेतात कापूण ठेवलेल्या धानाचा कडपा पावसात सापडत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. अनेकांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात पावसाने शेतकरी हवालदील झाले.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावला : शेतात पाणी साचून पेंढ्या भिजल्या, काढलेले धान वाचविण्याची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परतीच्या पावसाने जिल्ह्यात धान पीक उध्वस्त केले असून कापणीला आलेला धान पावसात ओला होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. दिवाळीच्या आनंदाच्या सणात परतीच्या पावसाने शेतकºयावर संकटाचा डोंगर उभा केला. शेकडो हेक्टरमधील कापलेल्या धानाच्या पेंढ्या (कडपा) पावसात ओल्या झाल्या असून बांध्याही पावसाच्या पाण्याचे तुडूंब भरल्याचे चित्र आहे.
गत आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. शनिवारी जिल्ह्यात सर्वत्र धोधो पाऊस कोसळला. दुपारच्यावेळी झालेल्या या पावसाने हाताशी आलेला धानाचा घास हिरावून नेला. सध्या शेतात धान कापणीचे काम जोरात सुरू आहे. मात्र पाऊस कोसळत असल्याने शेतात कापूण ठेवलेल्या धानाचा कडपा पावसात सापडत आहे. पवनी तालुक्यातील कोंढा परिसरात शनिवारी जोरदार पाऊस झाला. अनेकांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात पावसाने शेतकरी हवालदील झाले.
दिवाळीतच पावसाने शेतकºयाचे दिवाळे काढले. तुमसर, साकोली, लाखनी तालुक्यालाही पावसाचा मोठा फटका बसला. मोठ्या आशेने शेतकºयांनी धानाची कापणी सुरू केली होती. परंतु पावसाने त्यांच्या आशेवर पाणी फेरले.
शेतकºयांच्या आशेवर फेरले पाणी
यावर्षी कधी नव्हे ते धानाचे पीक समाधानकारक होते. विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात होती. चांगले उत्पादन येणार असल्याने शेतकरी सुखावला होता. परंतु ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने धान पिकाची मोठी हानी झाली. शेकडो हेक्टरमध्ये कापणीला आलेला धान आता पावसात भिजल्याने सडत आहे.

दिवाळी सुट्यामुळे पंचनामे लांबणार
परतीच्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाले. परंतु दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे पंचनामे लांबण्याची शक्यता आहे. सलग तीन दिवस सुट्या आहे. नुकसानीचा पंचनामा २४ तासात होणे गरजेचे असल्याने पीक विमा तरतुदीत म्हटले आहे. आता यावर प्रशासन कोणता तोडगा काढते आणि कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे

शेतकºयांना तात्काळ नुकसान भरपाई द्या- नरेंद्र भोंडेकर
परतीच्या पावसाने जिल्ह्यात विशेषत: भंडारा विधानसभा क्षेत्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी सूचना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे. यासंदर्भात ते जिल्हाधिकारी आणि महसूल व कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. आमदार भोंडेकर यांनी भंडारा आणि पवनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी देवून नुकसानीची पाहणी केली. शेतकºयांचे सांत्वन करीत त्यांनी मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस