शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादक दुहेरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

यावर्षी तर ओल्या दुष्काळासोबत किडींचा प्रादूर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोवणीपासून कापणीपर्यंत किडींचा प्रादूर्भाव होत आहे. धानपीक लोंबीवर आल्यावर ऐन कापणीच्या वेळी रोगांचा प्रादूर्भाव दिसत आहे. हिरवे गार दिसणारे धानपीक बुडापासून लोंबीपर्यंत करपून जात आहे. त्यामुळे लोंबी जमिनीवर पडत आहे.

ठळक मुद्देमदतीची अपेक्षा : परतीचा पाऊस आणि किडींचा प्रादुर्भाव, सर्वेक्षण अद्यापही सुरू नाही

न्यूज नेटवर्क
भंडारा : राबराब राबून पिकविलेला धान हातातोंडाशी आला असताना आता परतीचा पाऊस आणि किडींच्या प्रादूर्भावाने उद्ध्वस्त होत आहे. दुहेरी संकटाचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस आला असून पीक विम्यासोबत शासकीय मदतीची अपेक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे.
भंडारा जिल्ह्यात गत काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने दुष्काळाचा सामना करीत आहे. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी तर ओल्या दुष्काळासोबत किडींचा प्रादूर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रोवणीपासून कापणीपर्यंत किडींचा प्रादूर्भाव होत आहे. धानपीक लोंबीवर आल्यावर ऐन कापणीच्या वेळी रोगांचा प्रादूर्भाव दिसत आहे. हिरवे गार दिसणारे धानपीक बुडापासून लोंबीपर्यंत करपून जात आहे. त्यामुळे लोंबी जमिनीवर पडत आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सिंचनाचे साधन आहे. वैनगंगा, बावनथडी, चुलबंद, कन्हान आणि सुर नदीसोबत गोसेखुर्द व बावनथडी असे दोन मोठे प्रकल्प आहेत. परंतु अद्यापही नियोजनाअभावी शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणीच मिळत नाही.
यावर्षी सुरुवातीलाच पावसाने दडी मारली. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. त्यातून शेतकरी सावरत नाही तोच अतीवृष्टी झाली. आता ऐन दिवाळीच्या काळात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला आहे. शेतात कापलेल्या धानाचे फड आहेत. मात्र पावसाने कापलेला धान ओला होत आहे. या सर्व प्रकारात शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. शासनाने शेतकºयांना पीक विम्यासोबतच शासकीय मदतीची घोषणा करावी अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.

वन्यप्राण्यांचा फटका
जिल्ह्यातील बहुतांश शेती जंगलालगत आहे. जंगलातील रोही, रानडुक्कर, हरिण आदी वन्यजीव शेतात शिरून पिकांचे नुकसान करतात. धानपिकात रानडुकरांनी धुमाकुळ घातल्याने उभे पीक आडवे होत आहे. यासोबतच भाजीपाला पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. वनविभाग नुकसानभरपाई देत नसल्याने आणि शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करता येत नसल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे.

टॅग्स :agricultureशेती