शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

निसर्गाच्या वक्रदृष्टीने भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 9:49 PM

Bhandara News Agriculture पूरग्रस्त, परतीचा पाऊस मुळे बेजार झालेल्या सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांवर मावा तुडतुडा रोगाने नवीन संकट निर्माण केले आहे. उभ्या धान पिकांना जाळण्याचे प्रयत्न शेतकरी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : पूरग्रस्त, परतीचा पाऊस मुळे बेजार झालेल्या सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांवर मावा तुडतुडा रोगाने नवीन संकट निर्माण केले आहे. उभ्या धान पिकांना जाळण्याचे प्रयत्न शेतकरी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.वैनगंगा, बावणथडी नद्यांचे खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरात या अनेक संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. मार्च महिन्यापासून शेतकरी संकटात आहे. लॉकडाऊन नंतर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था संपूर्ण चौपट झाली आहे. या संकटातून मार्ग काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता नवीन संकट मानगुटीवर बसले असल्याचा प्रत्यय या परिसरात आलेला आहे. नद्यांचे खोऱ्यात असल्याने सुपीक शेतीचा शिक्का त्यांचे शेतीवर आहे. परिसरात पाण्याची कमतरता नाही. परंतु अस्मानी संकट त्यांना जगूच देत नाही. खरीप हंगामात धान पिकाची लागवड करण्यात आली असता, नद्यांचे पुराचे पाणी गाव आणि शेतशिवारात शिरले. एक नव्हे तब्बल चार दिवस पुराचे पाण्याने थैमान घातले.उभ्या धान पिकांची तणस झाली. काही प्रमाणात पीक शिल्लक होते. या धान पिकावर विविध रोगाने ताव मारण्यास सुरुवात केली. धान पीक कापणीच्या तोंडावर असताना मोठा आघात मावा तुडतुडा रोगाने दिला आहे. हातात येणारे पीक जाताना उघड्या डोळ्यांनी पाहताना शेतकऱ्यांचे डोळ्यात अश्रू आहेत. परंतु काहीच करता येत नाहीत. शासन अंतर्गत मदतीची अपेक्षा आहे. याच परिसरात मावा तुडतुडा रोगाने उभे धान पीक नष्ट केले होते.शेतकऱ्यांचे घरात एक पोती धान आले नव्हते. यामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी किसान गर्जनाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पटले यांचे नेतृत्वाखाली चुल्हाड बस स्थानक परिसरात तुमसर बपेरा राज्य मार्गावर धानाची पेंडी जाळून रास्ता रोको आंदोलन केले होते.

 

टॅग्स :agricultureशेती