शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बारमध्ये दारुची चोरी करणारा निघाला मालकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST

सागर सत्यनारायण कोयडीवार (२७) रा. पिंपळगाव कोहळी ता. लाखांदूर असे अटकेतील बार मालकाचे नाव आहे. पोलीस सुत्रानुसार १० ते ११ एप्रिल दरम्यान लाखांदूर- वडसा मार्गावरील गोल्डन बिअरबारमध्ये चोरी झाल्याची तक्रार बार मालक सागर कोयडीवार याने लाखांदूर पोलीस ठाण्यात केली. बारच्या पाठीमागच्या भागातून चोरी झाल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देलाखांदूरची घटना : स्वत:च्या दुकानातून नऊ लाखांची दारु चोरणारा अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : आपल्या बारमधून नऊ लाखांच्या दारुची चोरी झाल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेलेला बारमालकच चक्क चोर निघाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. ही घटना लाखांदूर येथे रविवारी सायंकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. लॉकडाऊनमध्ये दारु विक्रीसाठी चोरीचा बनाव केल्याचे निष्पन्न झाले असून आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सागर सत्यनारायण कोयडीवार (२७) रा. पिंपळगाव कोहळी ता. लाखांदूर असे अटकेतील बार मालकाचे नाव आहे. पोलीस सुत्रानुसार १० ते ११ एप्रिल दरम्यान लाखांदूर- वडसा मार्गावरील गोल्डन बिअरबारमध्ये चोरी झाल्याची तक्रार बार मालक सागर कोयडीवार याने लाखांदूर पोलीस ठाण्यात केली. बारच्या पाठीमागच्या भागातून चोरी झाल्याचे सांगण्यात आले. बारमध्ये चोरी झाल्याची तक्रार येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी पाठीमागील चॅनल गेट व दाराचे कुलूप कटरने कापून बारमधील दारु लंपास झाल्याचे आढळून आले. त्यात विदेशी दारुच्या ९९ पेट्या किंमत ७ लाख ८५ हजार ६२० रुपये, बिअरच्या ४१ पेट्या किंमत एक लाख १० हजार २३२ रुपये असा एकूण नऊ लाख दोन हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे पुढे आले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा व डीडीआरही चोरुन नेल्याचे दिसत होते.
सदर प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. लॉकडाऊनच्या काळात पोलिसांची गस्त असताना चोरी होणार कशी असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी बारमालक सागर कोयडीवार याची उलट तपासणी सुरु केली. त्यात बार मालकानेच आपल्या बारमध्ये लॉकडाऊनच्या काळात दारु विकण्यासाठी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिसांनी तात्काळ सागर कोयडीवार याला अटक केली. न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
लॉकडाऊनमुळे दारु बंदी असल्याने दारु चढ्या भावाने विक्री जात आहे. शौकीनांपर्यंत दारु पोहोचविण्यासाठी अनेक मार्ग अवलंबले जात आहेत. आतातर चक्क आपल्या स्वत:च्याच बारमध्ये चोरी करुन त्याची विक्री करण्याचा प्रकार लाखांदूर पोलिसांच्या समयसुचकतेने पुढे आला आहे. ही कारवाई लाखांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलीस शिपाई सोनल गेडाम, राजेंद्र कुरुडकर करीत आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


लॉकडाऊनमध्ये अवैध दारुला उधाण
लॉकडाऊनमुळे दारु विक्री बंद असली तरी शौकीनांचे चोचले पुरविण्यासाठी खुलेआम दारुची विक्री होत आहे. गावागावांत अवैध दारु विकली जात आहे. गत १५ दिवसात पोलिसांनी टाकलेल्या धाडीवरुनच हे सिध्द होत आहे. आता तर सील लावलेल्या दारु दुकानातून दारु बाहेर काढून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न होत आहे. लाखांदूरच्या चोरीची घटनाही याच प्रकारातून झाली. स्टॉक कमी दिसेल म्हणून तक्रार देण्याचा प्रयत्न अंगलट आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी