जिल्ह्यातील ५० हजारांवर मजुरांना मिळाला रोहयोत रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 05:00 AM2020-05-07T05:00:00+5:302020-05-07T05:00:42+5:30

मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे दरवर्षीच सुरु होतात. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार व लॉकडाऊनची पार्श्वभूमी लाभली असतानाही भंडारा जिल्हा प्रशासनाने मजुरांना रोजगार देण्यात यशस्वी नियोजन केले आहे. जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती अंतर्गत ४०४ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरु आहेत.

Over 50,000 laborers in the district got employment in Rohyot | जिल्ह्यातील ५० हजारांवर मजुरांना मिळाला रोहयोत रोजगार

जिल्ह्यातील ५० हजारांवर मजुरांना मिळाला रोहयोत रोजगार

Next
ठळक मुद्देलॉकडाऊन काळात आर्थिक आधार : सात तालुक्यातील ४०४ ग्रामपंचायती अंतर्गत सुरु आहेत कामे

इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ५० हजार ३३९ मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात जिल्हाभरातील ५४५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला असून त्यापैकी ४०४ ग्रामपंचायतीअंतर्गत कामे सुरु आहेत. लॉकडाऊनच्या काळातही मजुरांना रोजगार मिळाल्याने आर्थिक हातभार लाभला आहे.
मनरेगा अंतर्गत रोजगार हमी योजनेची कामे दरवर्षीच सुरु होतात. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार व लॉकडाऊनची पार्श्वभूमी लाभली असतानाही भंडारा जिल्हा प्रशासनाने मजुरांना रोजगार देण्यात यशस्वी नियोजन केले आहे. जिल्ह्यात ५४५ ग्रामपंचायती अंतर्गत ४०४ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरु आहेत. यात भंडारा तालुक्यातील ५५, लाखांदूर ४४, लाखनी ६२, मोहाडी ६१, पवनी ६३, साकोली ५० व तुमसर तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींनी रोहयोची कामे सुरु केली आहेत. यात एकूण सातही तालुक्यांतर्गत २११८ मस्टरवर या सर्व मजुरांची नोंदणी करण्यात आली आहे. तसेच २५१३ मजुरांना मात्र युआयडी अंतर्गत नोंदणी झालेली नाही.

त्या मजुरांनाही रोजगाराची संधी
लॉकडाऊन काळात परप्रांतातून किंवा परजिल्ह्यातून स्वगावी परतलेल्या मजुरांनाही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर कामधंदे उपलब्ध नसल्याने परत आले आहेत. अशा मजुरांना रोहयोची कामे उपलब्ध होऊ शकतात. काहींनी याचा लाभही घेण्यास सुरुवात केली आहे. नोंदणी करून खात्यातच मजुरीची रक्कम जमा होत असल्याने आर्थिक चणचणही दूर होणार आहे.

अशी आहेत तालुक्यातील मजूर संख्या
रोहयो अंतर्गत जिल्हाभरात विद्यमान स्थितीत ५० हजार ३३९ मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यात ५ मे पर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार भंडारा तालुक्यांतर्गत ३ हजार ४६८ मजूर, लाखांदूर १० हजार १३, लाखनी ७ हजार ४५१, मोहाडी ८ हजार १२४, पवनी ९ हजार ६५, साकोली ७ हजार २८० तर तुमसर तालुक्यांतर्गत ४ हजार ३९८ मजुरांना कामे उपलब्ध झाली आहेत.

Web Title: Over 50,000 laborers in the district got employment in Rohyot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.