शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

अन् ग्रामस्थांनीच उघड केला गैरप्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:52 IST

विविध योजनेंतर्गत यादीत नाव समाविष्ट करुन देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांनी गडविणाऱ्या ग्राम पंचायत लिपिकाचा भ्रष्टाचार हा ग्रामाभेत गावकऱ्यांनीच उघडकीस आणल्याचा प्रकार लगतच्या आंबागड (मिटेवानी) गट ग्रामपंचायत येथे घडला.

ठळक मुद्देआंबागड येथील प्रकार : लिपिकाला केले बडतर्फ, दोन दिवस गाजली ग्रामसभा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : विविध योजनेंतर्गत यादीत नाव समाविष्ट करुन देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांनी गडविणाऱ्या ग्राम पंचायत लिपिकाचा भ्रष्टाचार हा ग्रामाभेत गावकऱ्यांनीच उघडकीस आणल्याचा प्रकार लगतच्या आंबागड (मिटेवानी) गट ग्रामपंचायत येथे घडला.आंबागड (मि) येथे गट ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतला आंबागड, दावेझरी, रामपुर, गायमुख व जुना आंबागड या गावाचा समावेश आहे. अनुसूचित जमाती स्त्रियांकरिता सरपंचाचे पद राखीव असल्याने दयावती धर्वुे या महिला सरपंच बनल्या. येथील सरपंचाला अंधारात ठेवून ग्रामविकास अधिकारी . व्ही. एन. कुमेरिया व लिपीक रामेश्वर कामरकर यांनी संगनमताने ग्रा.पं. मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्यात घर टॅक्सचे पैसाचा परस्पर वापर, अपंगाना मिळणारी निधी, घरकुलाच्या यादीत नाव समाविष्ठ करण्याकरिता, शौचालय बांधकाम आदी योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी गौडबंगाल केला. त्याच बरोबर योजनेत निवड झालेल्या लाभार्थ्यांना लाभाचे धनादेश देण्याकरिता गावकऱ्याकडून अवैधरित्या वसूल करणे, योजनेअंतर्गत असलेले बांधकाम आदी न करता परस्पर पैशाची विल्हेवाट लावण्याच्या प्रकारात वाढ झाली. ५ डिसेंबर रोजी आयोजित ग्रामसभेत त्रस्त झालेल्या पाचही गावातील नागरिकांनी सदर प्रकाराचे कथन करताच भ्रष्टाचाराचे बिंग फुटले. आंबागड येथील नागरिक पवन जामुनपाणे, मंसुर शेख, विनोद ठाकरे, जयदेव जामुनपाने यांनी ग्रामसभेची धुरा सांभाळून लिपीक व ग्रामविकास अधिकाºयाला बडतर्फे करयाची मागणी रेटून धरली. बुधवारला झालेल्या ग्रामसभेत कोणताच निर्णय न लागल्याने दुसºया दिवशीही ग्रामसभेला सुरवात झाली.ग्रामसभेत लिपिकावर केलेल्या भ्रष्टाचारचे आरोप दस्ताऐवजानुसार सिध्द झाल्याने सर्वप्रथम ग्रामसभेत लिपीक रामेश्वर कोरमकर याला बडतर्फे केले व त्याचे संपुर्ण अधिकार काढून टाकले. मात्र सहदोषी ग्रामविकास अधिकारी कोणतीच कारवाई न झाल्याने दुसऱ्या दिवशीही उशिरापर्यंत ग्रामसभा सुरुच राहीली. ग्रामसभेला सरपंच दयावती धुर्वे, उपसरपंच सुनील टेंभरे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन ठाकरे, पं.स. सदस्य रेखा धुर्वे, पोलीस पाटील शंकर कांबळे व नागरिक उपस्थित होते.