बुद्ध जयंतीनिमित्त ऑनलाइन व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST2021-05-21T04:37:45+5:302021-05-21T04:37:45+5:30

महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर घेण्यात येणाऱ्या या व्याख्यानमालेचे २२ मे रोजी पहिले पुष्प मास्टर सुदस्सन पुणे हे ‘आधुनिक ...

Online lecture series on the occasion of Buddha Jayanti | बुद्ध जयंतीनिमित्त ऑनलाइन व्याख्यानमाला

बुद्ध जयंतीनिमित्त ऑनलाइन व्याख्यानमाला

महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर घेण्यात येणाऱ्या या व्याख्यानमालेचे २२ मे रोजी पहिले पुष्प मास्टर सुदस्सन पुणे हे ‘आधुनिक विज्ञान आणि बुद्ध धम्म’ या विषयावर, दुसरे पुष्प नागपूर येथील प्रसिद्ध विचारवंत प्रकाश खरात ‘आधुनिक बुद्ध धम्म आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर, तिसरे पुष्प ‘बुद्धाचा स्त्रीवाद’ या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख वंदना महाजन, चाैथे नांदेड येथील भदंत पंय्याबोधी हे ‘बुद्धाचा दु:खनिरोध’ या विषयावर गुंफणार असून, २६ मे रोजी अध्यक्षीय समारोप डाॅ.यशवंत मनोहर ‘तत्त्वज्ञानी बुद्ध’ हा विषय घेऊन करणार आहेत. त्यामुळे बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन व्याख्यानमालेस दररोज सांयकाळी ७ वाजता उपस्थित राहून वक्त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे आणि महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, अमृत बन्सोड, संजय मोखडे, डॉ. सीमा मेश्राम, छाया खोब्रागडे, डॉ. सुरेश खोब्रागडे, सुनंदा बोदिले, अरविंद निकोसे, देवानंद सुटे, सदस्य महेंद्र गडकरी, महादेव मेश्राम, डी.एफ. कोचे, ॲड. डी. के. वानखेडे, रूपचंद रामटेके, गुलशन गजभिये, मन्साराम दहिवले, आहुजा डोंगरे, करण रामटेके आदींनी केले आहे.

Web Title: Online lecture series on the occasion of Buddha Jayanti