शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर अपघातात एक ठार, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:46 IST

अर्जुनी मोरगाव: चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटल्याची घटना शनिवारी (दि.१२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास वडसा-कोहमारा राज्यमार्गावरील ग्राम खामखुराजवळ घडली. ...

अर्जुनी मोरगाव: चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटल्याची घटना शनिवारी (दि.१२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास वडसा-कोहमारा राज्यमार्गावरील ग्राम खामखुराजवळ घडली. यात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रॅक्टरमध्ये बसलेले पाच जण जखमी झाले. योगेश डाकराम ढोरे (४२, रा.कुरुड, गडचिरोली) असे मृत चालकाचे नाव आहे.

चालक योगेश ढोरे हा वडसाच्या दिशेने ट्रॅक्टर (क्र. एमएच ३४ एल १५७७) घेऊन जात होता. ग्राम खामखुराजवळील वळणावर ट्रक्टर आला असता, ढोरे याचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली उलटला. यात ढोरे याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला.

ट्रॅक्टरमध्ये बसलेले घनश्याम सिबू कचरे (४३), राजू चरणलाल वर्मा (४५), चंद्रशेखर महादेवराव कबोडे (४५), मनीष चंद्रशेखर खोब्रागडे (३५, सर्व रा. गोंदिया) व ग्यानबा महादेव पारधी (५०,रा. कुरुड) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, मृताचे शवविच्छेदन करून घटनेची नोंद अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

फिर्यादी दुर्योधन मधुकर पिलारे (३५,रा.कुरुड) यांच्या तक्रारीवरून पोलिसांत अपराध क्रमांक १४०-२०२१ कलम २७९, ३३७, ३०४ भादंवि सहकलम १८४ मोवाका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणेदार महादेव तोदले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक चंद्रकांत भोयर व पोलीस नायक प्रशांत बोरकर अधिक तपास करीत आहेत.