शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र जनगणनेसाठी ओबीसींचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 05:00 IST

ओबीसी समाजाची स्वतंत्र जनजणना करण्यात यावी, अशी ओबीसी वर्गाची जुनीच मागणी असताना केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करून २०२१ ची जनगणना करीत आहेत. त्यात ओबीसी जनगणना करण्याचा प्रावधान (कलम) नाही. त्यामुळे ओबीसींवर पुन्हा अन्याय होत आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्य शासनाला विनंती करीत महाराष्ट्र राज्यामध्ये आबीसींची वेगळी जनगणना करावी तसेच ओबीसी वर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, ....

ठळक मुद्देओबीसी क्रांती मोर्चाचा पुढाकार : जिल्हाधिकाऱ्यांना सोपविले निवेदन

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  ओबीसी वर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, या संवैधानिक मागणीसाठी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी धडक मोर्चा काढण्यात आला.ओबीसी समाजाची स्वतंत्र जनजणना करण्यात यावी, अशी ओबीसी वर्गाची जुनीच मागणी असताना केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करून २०२१ ची जनगणना करीत आहेत. त्यात ओबीसी जनगणना करण्याचा प्रावधान (कलम) नाही. त्यामुळे ओबीसींवर पुन्हा अन्याय होत आहे. केंद्र सरकारच्या ओबीसी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्य शासनाला विनंती करीत महाराष्ट्र राज्यामध्ये आबीसींची वेगळी जनगणना करावी तसेच ओबीसी वर्गाची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, ओबीसींना आरक्षण टक्केवारीपासून देण्यात यावे, शासकीय नोकरीत असलेले रिक्त पद लवकरात लवकर भरण्यात यावे, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती सर्व जातीच्या मुलींना देण्यात यावी, सर्वच जातीच्या मुलांना प्रतिदिन पाच रुपये उपस्थिती भत्ता देण्यात यावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधारा योजनेत ग्रामीण भागातील ओबीसी विद्यार्थ्यांना समाविष्ट करणे, समांतर आरक्षणामुळे २०१४ ते २०१८ मधील उमेदवारांच्या नियुक्त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे, ओबीसी प्रवर्गातील पदोन्नतीमध्ये अन्याय झालेल्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा, सत्र २०१९-२० संपला असूनही ओबीसी विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप जमा झालेली नाही. तत्काळ शासनाने ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासाठी राखीव जागा ठेवण्यात याव्या, ओबीसी विद्यार्थ्यांचा स्वतंत्र वसतिगृह प्रत्येक जिल्ह्यात लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, राज्यात ओबीसी वर्गातील अपंगांच्या नोकरीचा बॅकलॉग लवकरात लवकर फेर तपासणी करून भरण्यात यावा, या मागण्या मान्य करून घेण्यासाठी ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठय़ा संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले होते. शिवसेना जिल्हा अध्यक्ष व कार्यकर्ता, आदर्श युवा मंच गणेशपूर व रिपब्लिकन पँथर संघटना यांनी मोर्चाला जाहिर समर्थन देऊन मोर्चात सहभागी झाले.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीMorchaमोर्चा