शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता पोलिसांच्याही सुटीचे कॅलेंडर !

By admin | Updated: April 22, 2017 00:38 IST

राज्यात कार्यरत असलेल्या दोन लाखांवर पोलिसांसाठी एक खूशखबर आहे. त्यांच्या दैनंदिन ड्युटी, बंदोबस्ताचे ज्याप्रमाणे वेळापत्रक बनविले जाते,

भंडारा : राज्यात कार्यरत असलेल्या दोन लाखांवर पोलिसांसाठी एक खूशखबर आहे. त्यांच्या दैनंदिन ड्युटी, बंदोबस्ताचे ज्याप्रमाणे वेळापत्रक बनविले जाते, तसे त्यांना अर्जित रजा, सुट्टी मिळावी, यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात आता सुटीचे कॅलेंडर बनविले जाणार आहे. प्रत्येक पोलिसाला आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा, यासाठी साप्ताहिक सुटी आणि वर्षातून किमान एकदा १५ दिवस अर्जित रजा मिळणार आहे. येत्या आर्थिक वर्षापासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या अर्जित रजेचे कॅलेंडर बनविण्यात यावे, असे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, अधीक्षकांना दिले आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या मनुष्यबळामुळे सण, उत्सव, निवडणुका व आपत्कालीन स्थितीत बंदोबस्तात पोलिसांना हक्काच्या साप्ताहिक सुटी व रजांवरही अनेकवेळा गदा येते. त्यासाठी २०१७-१८ या वर्षासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी, प्रत्येक अंमलदाराच्या १५ दिवसांच्या अर्जित रजेचे नियोजन आतापासून करावयाचे आहे. त्याच वेळी कोणत्याही स्थितीत त्यांच्या साप्ताहिक सुटीवर गदा येऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावयाची आहे. एका दिवशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या मनुष्यबळापैकी १० टक्क्यांहून अधिक अंमलदार रजेवर असणार नाहीत, याची काळजी घेऊन रजेचे कॅलेंडर बनवायचे असून, त्याबाबत दर महिन्याच्या पाच तारखेला अहवाल उपअधीक्षकांकडे प्रभारी अधिकाऱ्यांनी सादर करायचा आहे. पोलीस अधीक्षकांनी प्रभारी अधिकाऱ्यांकडून हे काम करून घ्यायचे आहे. अर्जित रजेप्रमाणे गणेशोत्सव काळातील बंदोबस्तामुळे रजा घेता येत नसल्याने, त्या धनार्जित रजेमध्ये वर्ग करून कोषागार कार्यालयातून रक्कम जमा करण्यात येतील. प्रत्येक पोलिसाला हक्काची रजा मिळावी, यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील पोलिसांनी सुट्टीचे कॅलेंडर बनविले आहे. त्याच धर्तीवर राज्यातील आयुक्तालये व अधीक्षकांनी कार्यक्षेत्रात नियोजन करण्याची सूचना अपर महासंचालक (प्रशासन) प्रज्ञा सरवदे यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)