यापुढे खापाप्रकरणी कुणालाही अटक नाही

By Admin | Updated: September 5, 2016 00:37 IST2016-09-05T00:37:01+5:302016-09-05T00:37:01+5:30

उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी खापाकांड घडले. त्यात निरअपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकले.

No one was arrested yet | यापुढे खापाप्रकरणी कुणालाही अटक नाही

यापुढे खापाप्रकरणी कुणालाही अटक नाही

नाना पटोलेंचे आश्वासन : ‘ती’ कलम गुन्ह्यातून मागे घेणार
तुमसर : उपजिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी खापाकांड घडले. त्यात निरअपराध व्यक्तींवर गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकले. अन्य लोकांनाही अटक होणार असल्याने नागरिक प्रचंड दहशतीखाली आले आहेत. पंरतू यापूढे कुणालाही अटक होता कामा नये. म्हणून उच्चस्तरीय बोलणी झाली असून नागरिकांवर लावलेल्या गुन्ह्यातून भांदविची कलम ३३३ चा गुनहा पोलीस प्रशासन मागे घेत आहे. त्यामुळे अटकेत असलेल्या ११ जणांना मिळून ते लवकर स्वगृही परतणार असल्याची माहिती खासदार नाना पटोले यांनी दिली.
येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे २९ आॅगस्टला गर्भवती जयश्री राजेश ठवकर या महिलेचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करुन प्रतिउत्तर दिले होते. त्या प्रकरणी खापा येथील नागरिकांवर गुन्हे दाखल केले. ११ जणांना तुरुंगात डांबले. ही बाब खा. नाना पटोले यांना समजताच त्यांनी प्रकरणाची संपुर्ण चौकशी केली. विनाकारण त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. लाठीमार करण्याची उपविभागीय पोलीस अधिकारी जोगदंड यांनी तालुका दंडाधिकाऱ्यांची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. त्याचबरोबर कलम ६९ अन्वये आंदोलकांना अटक करता आली असती, पंरतु एसडीपीओंनी लाठीमार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांची तक्रार गृहमंत्र्यांकडे केली आहे. नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रविंद्र कदम जेव्हा पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी त्यांची दिशाभूल केली, असेही सांगण्यात आले. (शहर प्रतिनिधी)

काय आहे भांदविची कलम ३३३ ?
या कलमाअंतर्गत लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापुर्वक दुखापत पोहचविणे होय. यात १० वर्षाचा कारावास व द्रव्यदंड असे शिक्षेचा प्रावधान असून आजामीन पात्र गुन्हा आहे. सत्र न्यायालयातून सदर प्रकरण चालविले जाते.

Web Title: No one was arrested yet