शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलासाठी वाढीव निधी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

जिल्ह्यात रेती तस्करांचा धुमाकूळ लक्षात घेता प्रशासनाने अनेक ठिकाणी धाडसत्र दाबून रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशावेळी रेती उपलब्ध नसल्याने अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण आहेत. उल्लेखनिय म्हणजे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा गांधी आवास योजना, शबरी आवास योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देतालुक्यातील घरकुल रखडले : शासकीय उबंरठे झिजवून लाभार्थी झाले त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सातही तालुक्यात घरकुलांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. कुठे लाभार्थ्याला निधी तर कुणाला बांधकामाची मंजुरीच न मिळाल्याने अनेका लाभार्थ्यांचे घरकुल बांधण्याचे स्वप्न अधांतरी आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना इंदिरा गांधी आवास योजना यासह अन्य काही योजनेच्या अंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना ही योजना मंजूर करण्यात आली आहे मात्र निधी अपुरा पडत असल्याने अनेकांना घरकुल पूर्ण कसे करायचे असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात रेती तस्करांचा धुमाकूळ लक्षात घेता प्रशासनाने अनेक ठिकाणी धाडसत्र दाबून रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशावेळी रेती उपलब्ध नसल्याने अनेकांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण आहेत. उल्लेखनिय म्हणजे जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना, इंदिरा गांधी आवास योजना, शबरी आवास योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत.तसेच अनेक लाभार्थ्यांचे घरकुल बांधकाम अंतिम टप्प्यात असले तरी एका टप्प्याचा निधी न मिळाल्याने घरकुलांचे बांधकाम रखडले आहेत. कुणाचे नाव आले तर निधीचा थांगपत्ता नाही. अशावेळी काम सुरू तरी कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी अनेक घरकुल यादीमध्ये गोडबंगाल असून त्यांच्या नावावर आधी स्वतःचे घर आहे असे महाभागांना घरकुल योजनेचा लाभ मिळाल्याचे समोर येत आहे. खऱ्या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याचीही ओरड होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसह अन्य दोन योजनेमध्ये लाभार्थ्‍यांना दीड ते अडीच लाखांपर्यंत निधी बांधकामासाठी मिळत असतो. मात्र वाढत्या महागाईनुसार घरकुलाचे बांधकाम करणे परवडण्यासारखे नाही अडीच लाखांचा निधी कोकडा पडत असतो. शामुळे घरकुलासाठी वाढीव अनुदान देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.निधी पडतो अपुराघरकुल लाभार्थ्यांनी अनेकदा लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला वाढीव निधी देण्याबाबत अवगत केले आहे. मात्र लाभार्थ्याच्या भावनेची अजूनपर्यंत कदर झालेली नाही. वाढीव अनुदान करून दिल्यास अनेकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल यात शंका नाही. एकट्या भंडारा तालुक्यातील गणेशपुर जिल्हा परिषद क्षेत्रात अनेक घरकुलांची कामे याच्यामुळे रखडलेली आहेत तर काही घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत यासंदर्भात गणेशपुर येथील आदर्श युवा मंचचे अध्यक्ष पवन मस्के यांनी घरकुलांच्या लाभार्थ्यांना वाढीव अनुदान द्यावे अशी मागणीं केली आहे.भंडारा तालुका अंतर्गत गणेशपूर जिल्हा परिषद क्षेत्रात जवळपास १७ हजार लोकसंख्या आहे. यात गणेशपूर येथे आठ हजार १४८, पिंडकेपार ८५२, बेला एक हजार१९६, दवडीपार या गावाची लोकसंख्या १,.३२२ इतकी आहे. लोकसंख्येच्या अनुषंगाने घरकुल लाभार्थ्यांची समस्या सुटलेली नाही. अनेकांना शासनातर्फे मिळणारा घरकुल निधी तोकडा आहे. शासनाने यात वाढ करून देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.-पवन मस्के, अध्यक्ष,आदर्श युवा मंच गणेशपुर

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना