शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरच्या निष्काळजीमुळे नवजात बाळाचा मृत्यू

By admin | Updated: November 13, 2014 22:56 IST

नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सामान्य प्रसुती होणार असल्याचे सांगून एका स्त्रीरोगतज्ज्ञ महिला डॉक्टरने त्या रुग्णाला प्रसूतीसाठी वाट पाहण्यासाठी सांगितले. परंतु महिलेच्या वेदना

भंडारा येथील घटना : भोंगाडे कुटुंबीयांची कारवाईची मागणीभंडारा : नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सामान्य प्रसुती होणार असल्याचे सांगून एका स्त्रीरोगतज्ज्ञ महिला डॉक्टरने त्या रुग्णाला प्रसूतीसाठी वाट पाहण्यासाठी सांगितले. परंतु महिलेच्या वेदना लक्षात घेता तिच्या कुटुंबियांनी तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. तिथे शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्यात आली असता बाळ मृत जन्माला आले. वेळीच शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती केल्यामुळे महिलेचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. सदर घटना बुधवारच्या रात्री घडली.गणेशपूर येथील रहिवाशी अलका भोंगाडे यांची मागील नऊ महिन्यांपासून नियमित तपासणी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.दीप्ती डोकरीमारे यांच्याकडे सुरू होती. डॉ.दीप्ती डोकरीमारे या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. साई मंदिर मार्गावर त्यांचे खासगी रुग्णालय आहे. मागील आठवड्यात ५ नोव्हेंबर रोजी बाळाची हालचाल सुरु नसल्याचे लक्षात येताच भोंगाडे यांनी डॉ.डोकरीमारे यांचे रुग्णालय गाठले. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर चिंतेचे कारण नसल्याचे सांगून सर्व ठीक असल्याचे सांगितले. परंतु अलकाचा त्रास मात्र कमी झाला नाही. त्यामुळे भोंगाडे कुटुंबियांनी तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. त्यावेळी डॉक्टरांनी नाळ बाळाच्या गळ्याभोवती आवळली असल्याचे सांगून शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती करण्याचा सल्ला दिला. परंतु, डॉ.डोकरीमारे यांच्यावर विश्वास असल्यामुळे भोंगाडे कुटुंबिय पुन्हा त्यांच्याकडे गेले. त्यावेळीही डोकरीमारे यांनी सर्व नॉर्मल असल्याचे सांगून शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सांगितले. परंतु, ज्यावेळी त्रास वाढला तेव्हा डॉ.डोकरीमारे यांच्या रुग्णालयात गेले असता त्यांनी तपासणी केली. आता बाळाचे ठोके कमी झाले आहेत, परंतु सर्व सामान्य आहे, असे सांगितले. रात्री ९ च्या सुमारास अलकाला प्रसुती वेदना सुरु होताच पुन्हा डॉ.डोकरीमारे यांच्या रुग्णालयात नेले असता सोनोग्राफी करुन आणण्यासाठी सांगितले. सोनोग्राफी न पाहता काही करता येणार नाही, असे सांगून प्रसुती करण्यासाठी नकार दिला. भोंगाडे कुटुंबियांनी अलकाला सोनोग्राफी सेंटरमध्ये नेले. तिथे डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे त्यांची वाट पाहण्यात तासाभराचा वेळ गेला. वेदना वाढत असल्यामुळे त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली. तिथे रात्री १२.३० वाजता शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. जन्माला आलेले बाळ मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बाळाचा तीन दिवसांपूर्वीच पोटात मृत्यु झाला होता. गर्भवतीला रुग्णालयात आणण्यासाठी थोडासाही विलंब झाला असता तर मातेलाही धोका होण्याची शक्यता होती, असे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर पिडीत भोंगाडे कुटुंबियांनी संताप व्यक्त करीत या घटनेला जबाबदार असलेल्या डॉ.डोकरीमारे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)