शहरं
Join us  
Trending Stories
1
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
2
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
3
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
4
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
5
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
6
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
7
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
8
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
9
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
12
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
13
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
14
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
15
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
16
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
17
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
18
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
19
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
20
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
Daily Top 2Weekly Top 5

नवीन केंद्राचे प्रस्ताव धूृळ खात

By admin | Updated: July 12, 2014 23:32 IST

सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासन स्तरावर शालेय विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरविणे, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी जबाबदारी कमीत कमी १८ शाळामागे असलेल्या केंद्राकडे सोपविण्यात

सहा केंद्रांचा समावेश : शैक्षणिक नियोजनात तालुका मागे
साकोली : सर्वशिक्षा अभियानांतर्गत शासन स्तरावर शालेय विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरविणे, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढविण्यासाठी जबाबदारी कमीत कमी १८ शाळामागे असलेल्या केंद्राकडे सोपविण्यात आली आहे. परंतु शाळांच्या संख्येत केंद्राची संख्या कमी असून नवीन केंद्राचे प्रस्ताव गेल्या तीन वर्षांपासून शासन दरबारी धूळ खात पडले आहेत.
सर्वशिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत शाळांना साहित्य पुरवठ्याचे काम केले जाते. परंतु ही जबाबदारी असलेल्या नव्या केंद्राच्या निर्मिती संबंधाने शासकीय यंत्रणा उदासीनता दाखवीत आहे. मनुष्यबळ कमी असल्याने साकोली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या केंद्रातील केंद्राधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. शाळांच्या तुुलनेत केंद्राची संख्या कमी असल्याने शासनाचे धोरण कुचकामी ठरण्याच्या मार्गावर आहे.
केंद्र प्रमुखाला विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचे शैक्षणिक नियोजन आणि त्यांची पाहणी करणे अशी प्रमुख जबाबदारी असते. एका केंंद्रात कमीत कमी १८ शाळांचा समावेश असावा असे शासकीय धोरण आहे. ज्यामुळे केंद्र प्रमुखांना अधिकाधिक लक्ष पुरवून योग्यवेळी सहजपणे आपली जबाबदारी पार पाडणे शक्य होईल.
साकोली पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत सहा केंद्रांचा समावेश आहे. यात साकोली, सानगडी, कुंभली, विर्शी, पिंडकेपार व एकोडी या केंद्राचा समावेश आहे. साकोली केंद्रांतर्गत ५० शाळा, सानगडी २९ शाळा, कुंभली २८ शाळा, विर्शी २० शाळा, पिंडकेपार १८ शाळा आणि एकोडी केंद्रांतर्गत २२ शाळांचा समावेश आहे. या केंद्रांतर्गत शाळांची आकडेमोड केल्यास ५९ शाळांची संख्या केंद्रापेक्षा अतिरिक्त आहे.