शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

नेहा उईके आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी

By admin | Updated: August 25, 2016 00:27 IST

खापा येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनी नेहा उईके हिने गळफास लावून आत्महत्या केली.

तुमसर : खापा येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनी नेहा उईके हिने गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारला तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, प्रकल्प अधिकारी हरीराम मडावी यांनी कारली येथे तिच्या कुटुंबीयांना ७५ हजारांची सानुग्रह मदत दिली. नेहा ही आईवडीलांना एकुलती होती. दरम्यान, आमदार चरण वाघमारे यांनी मंगळवारला आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर चौकशीचे निर्देश दिले. याप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी आदिवासी संघटनेने केली आहे.शासकीय आश्रमशाळा खापा येथे नेहा हनेश उईके (१४) रा.कारली ही आठव्या वर्गात शिकत होती. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास पंख्याला गळफास लावून वसतिगृहात आत्महत्येचा प्रयत्न केला. दुसऱ्या विद्यार्थिनीचे लक्ष गेल्याने तिने आरडाओरड केली. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून तिला बाहेर काढले. ती बेशुद्ध होती. नागपूर येथे उपचारादरम्यान तिचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. उपचाराला प्राधान्य देण्यात आल्याचे मुख्याध्यापक प्रभाकर चोपकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कारली येथे नेहाची आई अनिता व वडील हनेश उईके यांना प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांनी ७५ हजाराचे सानुग्रह आर्थिक मदतीचा धनादेश दिला. यावेळी आदिवासी विकास आघाडीचे माजी जि.प. सदस्य अशोक उईके, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, प्रभा पेंदाम, अनिल टेकाम, कैलास गजाम, सूर्यकांत उईके, विनोद खंडाते, शालीक भलावी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)खापा शासकीय शाळेतील विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण गंभीर आहे. मुख्याध्यापकाने सांगितलेल्या माहितीत तथ्य दिसत नाही. मुलीचे आत्महत्येचे कारण वेगळे असल्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे सीआयडी चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.- अशोक उईके, माजी जि.प. सदस्य.