शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

जेष्ठांच्या समस्या निकाली काढणे गरजेचे

By admin | Updated: February 19, 2017 00:26 IST

सेवानिवृत्त व जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे व त्यांचा शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

जेष्ठांचा सत्कार : पवनीत संयुक्त वार्षिक अधिवेशनाची सांगतापवनी : सेवानिवृत्त व जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे व त्यांचा शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. जेष्ठांच्या समस्या निकाली काढणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. पवनी तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना तसेच पवनी तालुका जेष्ठ नागरिक संघटना यांची संयुक्त अधिवेशन पार पडले. यावेळी अ‍ॅड अवसरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पवनीच्या नगराध्यक्षा पूनम काटेखाये होत्या तर उद्घाटक आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवरे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. सभापती विकास राऊत, विजय काटेखाये, फेस्कॉमचे सचिव सुरेश रेवतकर, पतंजलीचे डॉ. गणेशसिंह बैस, माजी नगराध्यक्ष रजनी मोटघरे, दुध संघ मुंबईचे संचालक विलास काटेखाये, कृषी भूषण नारायण भोगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन पंचभाई, डॉ. भागवत आकरे, यु.सा. देशभ्रतार होते.दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. प्रास्ताविक डी.बी. युवगांवकर यांनी केले तर अहवालवाचन वासूदेव रायपूरकर यांनी केले. नगराध्यक्षा पूनम काटेखाये यांनी न.प. शी संबंधित सेवानिवृत्त कर्मचारी तथा जेष्ठ नागरिक यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले तसेच वृद्धाश्रमाची तालुक्यात आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. संजय निराधार योजनेचे अध्यक्ष विजय काटेखाये, माजी नगराध्यक्षा रजनी मोटघरे, सुरेश रेवतकर, देशभ्रतार, विलास काटेखाये, मोहन पंचभाई, विकास राऊत यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी पुंडलिक सपाटे, रजनी मोटघरे, विलास काटेखाये, मोहन पंचभाई यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कर करण्यात आला. तसेच ७० वर्ष पूर्ण झालेले सेवानिवृत्त कर्मचारी माणिक गाडेकर, मनोरमा करंजेकर, इंदिरा अंबादे, श्रीराम करंजेकर, शंकर टेकाम, शामराव वंजारी, दादा करूटकर, श्रीकृष्ण भोयर, प्रतिभा बोदलकर, नत्थू धारगावे, लक्ष्मण धकाते, सावरबांधे, दादा चौधरी, सुमन वैद्य, सावरकर, करंजेकर, खानोरकर, सुमन कोतपल्लीवार, मैना धारगावे, विमल पोटवार, शांता आप्तुरकर, चंद्रभागा चौधरी, डॉ. गणेशसिंह बैस, कोंढा केंद्र - वसंता भुरे, आर.एस. मरखडे, व्ही.बी. सेलोकर, डी.एल. गाडेकर. आसगाव केंद्र - दामोधर कोरे, शामदेव गभने, निलकंठ मोटघरे, मुक्ता हत्तीमारे, अंजना भेंडारकर, आनंदा हेमणे, गंगू डडमल, तारा फुंडे, सरस्वती खळसिंगे, सागरता आठरे. पवनी केंद्र - धमेंद्र, निलकंठ बावनकर, कौसेकर साखरे, भिवरा कोचे, डॉ. चांदेवार, कुसुम दलाल तसेच ८० वर्षावरील शरद देशपांडे, दयाराम आकरे, देवनाथ वाकडीकर, शिवहर दलाल, मोतीराम मोहनकर, शंकरराव हटवार, व गुलाबराव करंजेकर यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. विकास बावनकुळे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)