शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

औषधं हवी? पानटपरी, किराणा दुकानात चला!

By admin | Updated: November 8, 2014 00:49 IST

जिल्ह्यात कुठेही आणि केव्हाही ज्याप्रमाणे खरमुरे फुटाण्यांची विक्री होते त्याचप्रमाणे किराणा दुकान ...

भंडारा : जिल्ह्यात कुठेही आणि केव्हाही ज्याप्रमाणे खरमुरे फुटाण्यांची विक्री होते त्याचप्रमाणे किराणा दुकान व पानटपऱ्यांमधून जीवघेण्या औषधांची सर्रास आणि खुलेआम विक्री सुरू आहे. ग्रामीण भागातील किराणा दुकान व राष्ट्रीय महामार्गावरील ढाब््यानजीक असलेल्या काही पानटपऱ्यांमध्ये या घातक औषधांची व्रिकी सुरू असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले. या दुकानदारांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या होलसेलर्स औषध विक्रेत्यांनाही प्रशासनमधील अधिकाऱ्यांचेच पाठबळ असल्याची माहिती आहे.औषध खरेदी किंवा विक्री चुकीची झाल्यास त्याचा थेट परिणाम मानवाच्या आरोग्यावर हात असून, त्याचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. औषध विक्री आणि खरेदी करण्यासाठी शासनाने नियमावली ठरवून दिली. तसा कायदाही करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे देण्यात आली आहे. औषध विक्री करण्यासाठी ड्रग अ‍ॅन्ड कॉस्मेटिस अ‍ॅक्ट १९४० च्या कलम ६५ (२) नुसार अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक आहे. यासोबतच रजिस्टर्ड फार्मासिस्टची उपस्थिती व डॉक्टरच्या चिठ्ठीवरच औषध विक्री करण्याचा कायदा करण्यात आला आहे. या कायद्याला जिल्ह्यातील किराणा दुकानदार व पानटपऱ्यांवर पायदळी तुडविण्यात येत आहे. किराणा दुकानदार व पानटपऱ्यांवर खुलेआम औषधांची विक्री करण्यात येत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली. या औषधांमुळे वाढत्या वयात किडणीवर परिणाम होत असून काहींना रिअ‍ॅक्शन येण्याचा धोका आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी औषध दुकान असतानाही अशा गावांमध्ये किराणा दुकानांवरही औषध मिळत असल्याचे लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. किराणा दुकानदार व पानटपरी चालकांना दवा बाजारातील होलसेलरस औषध विक्री करीत असल्याची माहिती आहे. किरकोळ औषध विक्रेत्यांनाच औषध विक्री करून त्याचे देयक ठेवण्याचे आदेश होलसेलर्स औषध विके्रत्यांना आहेत. किराणा व पानटपऱ्यांवर मिळणारे औषध विनादेयकानेच खरेदी व विक्री करण्यात येत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)