शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी राजकारणात उतरणे गरजेचे

By admin | Updated: September 1, 2016 00:46 IST

विदर्भ हे काँग्रेसच्या राजकारणाचे केंद्र राहिले होते व त्यांचा प्रभाव काही प्रमाणात दिसतो आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी आता राजकारणात उतरण्याची आवश्यकता आहे,

श्रीहरी अणे : भंडारा येथे जाहीर सभेत आवाहनभंडारा : विदर्भ हे काँग्रेसच्या राजकारणाचे केंद्र राहिले होते व त्यांचा प्रभाव काही प्रमाणात दिसतो आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी आता राजकारणात उतरण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन माजी महाधिवक्ता अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी केले.विदर्भ राज्य आघाडीतर्फे विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये राजकीय जनजागृती अभियान सुरू असून सार्वजनिक वाचनालयात आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.पद्माकर टेंभुर्णीकर होते. यावेळी अनिल जवादे, अ‍ॅड.निरज खांदेवाले, अ‍ॅड.सुरेन पारधी, जिल्हा संघटक रमाकांत पशिने, अविनाश पनके, प्रा.सुधाकर वडेटवार, केशव हुड, अरविंद ढोमणे, मार्कंड नंदेश्वर, अ‍ॅड.जयेश बोरकर, रामदास महाकाळकर, देवदास गभणे, माधव तिरपुडे, प्रणाली कटकवार, मधुबाला पशिने, अ‍ॅड.प्रमोद काटेखाये, अ‍ॅड.सतीश ठवकर, डॉ.गोविंद कोडवानी, छैलबिहारी अग्रवाल, गुरमित सिंग चावला, राहुल बडोले, संजय निनावे, मोरेश्वर कारेमोरे, अ‍ॅड.एम.एल. भुरे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, काँग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भाला सहकार्य मिळत नाही. शिवसेनेचा विदर्भासाठी कायम विरोध असला तरी त्याला फारसे महत्व नाही. शिवसेनेचे प्रस्थ मुंबईपुरते सिमीत आहे आणि विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दुसरा पर्याय नसल्याने नाईलाजास्तव काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीला निवडून देण्याविषयी वैदर्भीय जनतेला पर्याय नसतो. जेव्हा जनतेसमोर या पक्षांना विदर्भवादी वेगळा पर्याय देतील तेव्हा निश्चितच विदर्भातील जनता, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना यांना बाहेरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास आहे. यावेळी अ‍ॅड.पद्माकर टेंभुर्णीकर म्हणाले, आता अंताची लढाई आहे हे सरकारने तसेच विरोधकांनी समजून घ्यावे. वातावरण तापले आहे. केवळ ठिणगी पडणे बाकी आहे. आम्ही सनदशीर मार्गाने विदर्भाचा लढा चालवित आहेत. परंतु त्यालाही काही मर्यादा व सीमा आहे. ज्यावेळेस या सीमा तुटून पडतील तेव्हा होणाऱ्या परिणामास विरोधक व सरकार स्वत:च जबाबदार राहतील हे सत्ताधाऱ्यांनी समजून घ्यावे, असे आव्हान अ‍ॅड.टेंभुर्णीकर यांनी केले. संचालन जिल्हा सचिव केशव हुड यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.सुधाकर वडेटवार यांनी केले. (नगर प्रतिनिधी)