शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
4
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
7
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
8
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
9
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
10
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
11
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
12
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
13
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
14
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
15
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
16
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
17
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
18
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
19
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
20
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सर्व शक्तीनिशी लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST

परिवार संवाद दाैऱ्यानिमित्त शनिवारी ते भंडारा जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी भंडारा येथील बालाजी लाॅनमध्ये आयाेजित बैठकीत मतदारसंघनिहाय आढावा घेऊन ...

परिवार संवाद दाैऱ्यानिमित्त शनिवारी ते भंडारा जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी भंडारा येथील बालाजी लाॅनमध्ये आयाेजित बैठकीत मतदारसंघनिहाय आढावा घेऊन मार्गदर्शन केले. पाटील म्हणाले, राज्यात कसल्याही निवडणुका नसताना पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आपण येथे आलाे आहोत. मित्र पक्षाला साेडलेल्या विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेणे आपले कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडण्यासाठी मी तुमच्यापर्यंत पाेहाेचलाे, असे त्यांनी सांगितले. आगामी काळात हाेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस सर्व शक्तीनिशी लढणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्या साेडविण्यासाठी कामाला लागावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

या वेळी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, आमदार राजू कारेमाेरे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, धनंजय दलाल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, विदर्भ दाैरा समन्वयक प्रवीण कुंटे, मधुकर सांभारे, विजय डेकाटे, सरिता मदनकर, सुनंदा मुंडले, यशवंत साेनकुसरे आदी उपस्थित हाेते.

बाॅक्स

भंडारा-गाेंदिया जिल्ह्याला सक्षम नेतृत्व

भंडारा आणि गाेंदिया जिल्ह्याला राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन यांचे सक्रिय नेतृत्व लाभले आहे. या दाेन्ही जिल्ह्यांत अनेक समस्या असल्या तरी त्या समस्या मार्गी लावण्यासाठी येथील नेतृत्व सक्षम असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. भंडारा जिल्हा दाैऱ्यापूर्वी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी जलसंपदा विभागाच्या अनेक प्रकल्पांवर आपल्यासाेबत चर्चा केली. सिंचन विभागाच्या सर्व समस्या आपण निश्चितपणे मार्गी लावणार आहाेत. परंतु कार्यकर्त्यांनी इतरही समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने सक्रिय राहावे, असे आवाहन त्यांनी केले.