साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद असे नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2016 00:34 IST2016-08-22T00:34:06+5:302016-08-22T00:34:06+5:30

साकोली नगरपरिषदेला साकोली सेंदुरवाफा असे नाव देण्यात यावे,

Name as Sakoli-Sedurawafa Municipal Council | साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद असे नाव द्या

साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद असे नाव द्या

मागणी : प्रफुल पटेल यांना निवेदन
साकोली : साकोली नगरपरिषदेला साकोली सेंदुरवाफा असे नाव देण्यात यावे, असे निवेदन आमदार राजेंद्र जैन व जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी खासदार प्रफुल पटेल यांना दिले.
या निवेदनानुसार, साकोली नगरपरिषदेत सेंदुरवाफा या गावाचाही समावेश करण्यात आला असताना शासनाने फक्त साकोली नगरपरिषद असे नाव दिले आहे. त्यामुळे सेंदुरवाफा या गावावर अन्याय झाला आहे. त्यामुळे शासनाने सेंदुरवाफा या गावावर झालेला अन्याय दूर करावा व साकोली नगरपालिकेला साकोली सेंदुरवाफा असे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी माजी सभापती मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, सरपंच रामचंद्र कोहळे, सुरेशसिंह बघेल, पद्माकर गहाणे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Name as Sakoli-Sedurawafa Municipal Council