शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 6:00 AM

७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रामागील एका शेतात त्याचा मृतदेह आढळला होता. तो ४ नोव्हेंबर रोजी रात्रकालीन प्रो-कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता. परंतु घरी परतच आला नाही. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर लाखांदूर ठाण्यात सोहम बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. अखेर तीन दिवसानंतर धानाच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला होता.

ठळक मुद्देकुडेगावचे प्रकरण : गळा आवळून ठार केल्याचे स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील कुडेगाव येथील विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी अखेर आठ दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उत्तरीय तपासणी अहवालात त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले असून आता आरोपींना शोधण्याचे आव्हान लाखांदूर पोलिसांपुढे आहे.सोहम गजानन मानकर (१६) रा. कुडेगाव असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रामागील एका शेतात त्याचा मृतदेह आढळला होता. तो ४ नोव्हेंबर रोजी रात्रकालीन प्रो-कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता. परंतु घरी परतच आला नाही. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर लाखांदूर ठाण्यात सोहम बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. अखेर तीन दिवसानंतर धानाच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला.सोहमचा मृतदेह संशयास्पद स्थितीत पडून होता. मृतदेहापासून ७० ते ७५ फुट दूरवर त्याच्या चपला पडलेल्या होत्या. तसेच गळ्याजवळ आवळल्याचे दिसत होते. परंतु पोलीस याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. राजकीय आणि सामाजिक संघटनानी याप्रकरणी आवाज उठविला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली. मात्र पोलीस उत्तरीय तपासणी अहवालावर अडून बसले होते. नातेवाईकांसह गावकऱ्यांतही यामुळे संताप व्यक्त केला जात होता. पोलीस मात्र गुन्हा दाखल करीत नव्हते.अखेर बुधवारी सोहमचा उत्तरीय तपासणी अहवाल पोलीस ठाण्यात प्राप्त झाला. गळा आवळून खुन झाल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिसांनी गुरुवारी खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. आता सोहमचा खुन कुणी आणि कशासाठी केला. याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन लाखांदूर पोलिसांपुढे आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मनोहर कोरेटी करीत आहेत.बालकदिनी मिळाला न्यायआठवड्याभरापासून पालकांसह नातेवाईक सोहमच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते. परंतु पोलीस कुणाचेही ऐकण्यात मनस्थितीत दिसत नव्हते. अखेर बुधवारी याप्रकरणी उत्तरीय तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यावरुन १४ नोव्हेंबर या बालकदिनी सोहमच्या मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बालक दिनी एका विद्यार्थ्याला न्याय मिळाला.आरोपींचा शोध घेण्याचे आव्हानसोहम मानकर याचा खुनच झाल्याचे आता सिध्द झाले आहे. गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. मात्र त्याचा खुन कुणी केला या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्यापही पोलिसांना सापडले नाही. खुनाचा गुन्हा तर दाखल झाला. मात्र आरोपी शोधण्याचे आव्हान लाखांदूर पोलिसांपुढे आहे. दहाव्या वर्गात शिकणाºया विद्यार्थ्याचा खुन कशासाठी करण्यात आला, याचाही शोध घेण्याची गरज आहे. लवकरच आरोपी जेरबंद होतील असे पोलीस सांगत आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू