शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

मुग, मटकी ऐवजी पोषण आहार म्हणून मसूर, चवळीचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:39 AM

अंगणवाडी केंद्राला शासनाकडून आहाराचा पुरवठा करण्यात येतो. यात सहा महिन्याचे तीन वर्ष सर्वसाधारण व सहा महिने ते तीन वर्ष तीव्र कमी वजनाचे बालके तसेच गरोदर व स्तनदा माता यांचा समावेश आहे. सदर आहारात गहू, चवळी, मसूर डाळ, सोयाबीन तेल, हळद पावडर, मिरची पावडर, मीठ या धान्य व इतर साहित्याचा समावेश आहे. या पोषण आहाराचे सिलबंद पाकीट सध्या दिले जात आहेत.

ठळक मुद्देमहागाईचे कारण । बालके, गरोदर व स्तनदा माता आहेत लाभार्थी

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : बालके, गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहाराची सिलबंद पाकीटे वितरीत करण्यात येतात. सदर पाकीटात आतापर्यंत मुग व मटकी दिली जात होती. मात्र गत काही दिवसांपासून मुग, मटकी ऐवजी पोषक आहार म्हणून मसूर व चवळीचा पुरवठा करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पोषक तत्वे अधिक असलेला आहार बंद करण्यामागचे कारण म्हणजे मुग व मटकी महाग झाल्याने सांगितले जाते.अंगणवाडी केंद्राला शासनाकडून आहाराचा पुरवठा करण्यात येतो. यात सहा महिन्याचे तीन वर्ष सर्वसाधारण व सहा महिने ते तीन वर्ष तीव्र कमी वजनाचे बालके तसेच गरोदर व स्तनदा माता यांचा समावेश आहे. सदर आहारात गहू, चवळी, मसूर डाळ, सोयाबीन तेल, हळद पावडर, मिरची पावडर, मीठ या धान्य व इतर साहित्याचा समावेश आहे. या पोषण आहाराचे सिलबंद पाकीट सध्या दिले जात आहेत. परंतु मागील दोन महिन्यांपासून मुग व मटकी पोषण आहारात देणे बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी मसूर व चवळी हा आहार दुबार देण्यात येत आहे. मुग व मटकीचा दर कडाडल्याने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.मुगाचे प्रतिकिलो मुल्य ७० ते ७५ तर मटकीचे दर ७५ रुपये प्रतिकिलो आहे. मसूर व चवळी बाजारात ५५ ते ६० रुपये किलोप्रमाणे उपलब्ध आहे. एक किलोवर २० ते १५ रुपयाचा फटका आहे. मुग आणि मटकीत पोषक तत्वे व फायबर अधिक असतात.तुमसर येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय आहे. गत दोन वर्षांपासून विस्तार अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. लाखनी येथील विस्तार अधिकारी येथे प्रभारी असून आठवड्यातून दोन दिवस सेवा पुरवित आहेत. मोहाडी येथे बालविकास प्रकल्प अधिकाºयाचे पद रिक्त आहे. तुमसर येथील अधिकारी मोहाडीचा प्रभार सांभाळत आहेत. पोषण आहाराबाबत विस्तार अधिकारी उमेश खाकसे यांना विचारले असता मटकी व तूर देणे सध्या बंद असून त्याऐवजी मसूर व चवळी दिली जात असल्याचे सांगितले.

टॅग्स :foodअन्न