शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसन कार्यालय स्थानांतरणाच्या हालचाली

By admin | Updated: May 9, 2017 00:23 IST

जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पुनर्वसन कार्यालय आंबाडी येथे आहे.

शिवसेनेकडून आंदोलनाचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांचा मार्फत जलसंपदा मंत्र्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाचे पुनर्वसन कार्यालय आंबाडी येथे आहे. हे कार्यालय नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात स्थानांतरित करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु झाल्या आहे. कार्यालयाचे स्थानांतरण होऊ देणार नाही अशा इशारा शिवसेना जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी दिला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जलसंपदा मंत्र्यांना निवेदन पाठविले आहे. पवनी येथील वैनगंगा नदीवर १९८८ ला गोसेखुर्द प्रकल्पाला पायाभरणी करण्यात आली. या राष्ट्रीय प्रकल्पामुळे भंडारा जिल्ह्यातील १०४ गावे बाधीत झाले आहे. त्यात ३४ गावे हे पूर्णत: बाधीत आहेत. तर ७० गावे अंशत: बाधीत आहेत. या प्रकल्पामुळे जिल्ह्याचे सुमारे १० हजार हेक्टर शेतजमीन बुडीत क्षेत्राखाली आले आहे. मागील तीस वर्षांपासून प्रकल्प बाधीत गावांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही. काही गावांचे पुनर्वसन झाले असून अनेक गावांचा प्रश्न अधांतरी आहे. पिंडकेपार, सालेबर्डी या गावांचा नागरी सुविधांचा कामाना गती नाही. पुनर्वसनाचे काम आंबाडी येथील कार्यालयातून सुरु आहे. मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाल आता या कार्यालयाचे नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे स्थानांतरण करण्याच्या हालचाली सुरु केले आहे. जानेवारी मध्ये जलसंपदा विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या माध्यमातून हा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. नागरिकांना नागरी सुविधा मिळायच्या पूर्वीच प्रशासनाने कार्यालय हलविण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यामुळे प्रशासनाने कार्यालय हलविण्याचा रचलेला घाट थांबवावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यावेळी गणेशपूर ग्रामपचांयतचे उपसरपंच यशवंत सोनकुसरे, यशवंत टिचकुले, मोरेश्वर वनवे, श्रावण खंगार, विनोद राकडे, रणवीर कांबळे, सोमाजी कांबळे, चंद्रकांत कारेमोरे, तुळसीदास शेंडे, रामेश्वर शेंडे, क्रिष्णा साठवणे, राजेंद्र तांबुलकर, रोहित साठवणे आदी उपस्थित होते.