शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

By admin | Updated: August 18, 2016 00:16 IST

तालुक्यातील कृषीपंपाचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी शेतकरी दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत.

ऊर्जामंत्र्यांशी बैठक रद्द : भारनियमन मात्र ‘जैसे थे’साकोली : तालुक्यातील कृषीपंपाचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी शेतकरी दोन महिन्यापासून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहेत. एवढेच नाही तर शेतकऱ्यांनी उर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी प्रत्यक्षात भेट घेऊन चर्चा केली. मात्र त्यातही तोडगा निघाला नाही. शेवटी शेतकऱ्यांनी काल मंगळपासून वीज वितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. यावर्षी पावसाळ्यापूर्वीपासूनच कृषी पंपाचे १६ तासांचे भारनियमन सुरु आहे. हे भारनियमन सुरु असल्यामुळे शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली. तर कशीबशी केली. त्या शेतकऱ्यांसमोर आता पाणी कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाला. कारण १६ तासांच्या भारनियमनामुळे फक्त ८ तास वीज पुरवठा मिळत आहे व या आठ तासात शेतीला पाणीपुरवठा होऊ शकत नाही. परिणामी शेतातील धानाचे काय होईल या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.१६ तासांचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला निवेदन दिले. प्रत्यक्षात कार्यकारी अभियंता यांना या संदर्भात माहिती दिली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अखेर दि. १४ ला शेतकऱ्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रत्यक्षात भेट घेऊन चर्चा केली. यावर बावनकुळे यांनी १६ ला सकाळी संबंधित अधिकारी व खासदार, आमदार व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ यांची बैठक बोलाविली होती. मात्र ती आज रद्द करण्यात आली. मात्र जोपर्यंत हे भारनियमन बंद होणार नाही. तोपर्यंत आंदोलन करू अशी भूमिका शेतकऱ्यांची असल्याने आजपासून हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अशोक कापगते, अविनाश ब्राम्हणकर, मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, केवळराम लांजेवार, नरेंद्र वाडीभस्मे, शैलेश गजभिये, बोरकर यांच्यासह तालुक्यातील हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)