शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

साकोली, लाखांदूरमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:00 AM

राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तब्बल महिनाभर जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र २७ एप्रिल रोजी गराडा येथील एका ४५ वर्षीय महिलेचा नमूना पॉझिटिव्ह आला आणि भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या ४० वर पोहचली आहे. आतापर्यंत १२ रुग्ण कोरोनामुक्त झाली असून ३१ क्रियाशिल रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्देअ‍ॅक्टिव्ह रुग्ण ३१ : आतापर्यंत १२ कोरोनाबाधितांना सुटी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुरुवातीला कोरोनामुक्त असलेल्या जिल्ह्यात आता जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोना बाधीतांची संख्या ४० वर पोहचली असून सर्वाधिक रुग्ण साकोली आणि लाखांदूर तालुक्यातील आहेत. पुणे आणि मुंबई येथून आलेल्या व्यक्तींमुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत १२ कोरोनाबाधीतांना सुटी देण्यात आली असून सध्या जिल्ह्यात ३१ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तब्बल महिनाभर जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र २७ एप्रिल रोजी गराडा येथील एका ४५ वर्षीय महिलेचा नमूना पॉझिटिव्ह आला आणि भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या ४० वर पोहचली आहे. आतापर्यंत १२ रुग्ण कोरोनामुक्त झाली असून ३१ क्रियाशिल रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण साकोली आणि लाखांदूर तालुक्यात असल्याचे दिसत आहे. साकोली तालुक्यात १८ आणि लाखांदूर तालुक्यात ११ कोरोनाबाधीत असल्याची नोंद घेण्यात आली. या तालुक्यांसह जिल्ह्यात मुंबईसह महानगरातून आलेल्या बहुतांश व्यक्ती कोरोनाबाधीत असल्याचे पुढे आले आहे. भंडारा तालुक्यात पाच, तुमसर, मोहाडी आणि लाखनी तालुक्यात प्रत्येकी एक तर पवनी तालुक्यात तीन कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे.जिल्ह्यात आज दोन कोरोनाबाधीतांची नोंदलाखांदूर तालुक्यातील दोन व्यक्तींचे नमुने बुधवारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे दोन व्यक्ती १५ व १६ मे रोजी मुंबई येथून लाखांदूर तालुक्यात आले होते. दोन्ही व्यक्ती पुरुष असून त्यांचे वय २६ व २८ आहे. या दोघांनाही क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. मंगळवारी रात्री दोन्ही व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.१९९७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्हांडारा जिल्ह्यातून आतापर्यंत २०७५ व्यक्तींच्या घशातील स्त्रावांचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर १९९७ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. ३८ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.बुधवारपर्यंत येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डामध्ये ३२ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ३३० व्यक्तींना सुटी देण्यात आली. तर कोवीड केअर सेंटर साकोली, तुमसर, मोहाडी येथे २४० व्यक्ती भरती आहेत. १५३० व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे. प्रशासन बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर करडी नजर ठेवून असून कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणीकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील १४० अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नागरिकांच्या नेहमी संपर्कात असलेल्या कर्मचाºयांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. इतर कार्यालयातही आरोग्य तपासणीची आवश्यकता आहे.९५ हजार नागरिकांकडे आरोग्य सेतू अ‍ॅपजिल्ह्यात आतापर्यंत ९५ हजार २२ नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केला आहे. भारत सरकारने कोवीड - १९ ची माहिती सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य सेतू अ‍ॅप विकसीत केला आहे. जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी हा अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील तब्बल ९५ हजार २२ नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या